
दैनिक स्थैर्य । दि. ०१ फेब्रुवारी २०२३ । गुहागर । बौद्धजन सहकारी संघ शाखा क्र. ३६ मौजेगाव पोमेडी तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी या शाखेचे अध्यक्ष संजय तथा तात्या सावंत व अशोक सावंत यांच्या मातोश्री आदर्श सभासद, धडाडीच्या कार्यकर्त्या महिला मंडळ अध्यक्षा, आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ता कालकथित रुक्मिणी सिताराम सावंत यांचा स्मृतिदिन रविवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक दहा वाजता महादेव तांबे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.
तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून आपल्या आदर्शास श्रद्धांजली अर्पण करावी अशी विनंती शाखेचे सचिव परशुराम सावंत यांनी शाखेद्वारे काढलेल्या परिपत्रकात केली आहे.