दैनिक स्थैर्य | दि. १२ नोव्हेंबर २०२१ | फलटण | फलटण पंचायत समितीच्या सभापती पदाचा राजीनामा श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर व उपसभापती पदाचा सौ. रेखा खरात यांनी राजीनामा दिल्याने फलटण पंचायत समितीचे सभापती व उपसभापती पद रिक्त झालेले आहे. तरी सभापती व उपसभापती निवड होईपर्यंतच्या कालावधीमध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. सोनाली पोळ यांनी कार्यभार सांभाळावा, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी पारित केलेले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, फलटण पंचायत समितीच्या सभापती पदाचा राजीनामा श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर – निंबाळकर यांनी नुकताच दिलेला होता. त्या आधी फलटण पंचायत समितीचे उपसभापती सौ. रेखा खरात यांनी आपल्या उपसभापती पदाचा राजीनामा सभापती श्रीमंत स्वरूपाचे खर्डेकर – निंबाळकर यांच्याकडे सादर केलेला होता. सदरील दोन्ही राजीनामे मंजूर होऊन सभापती पदाचा कार्यभार हा सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. सोनाली पोळ यांच्याकडे देण्यात आलेला आहे. याबाबतचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी पारित केलेला आहे.