शेंद्रे ता. सातारा येथील जळीतग्रस्तांना मदतीचा धनादेश देताना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले. शेजारी अनंता वाघमारे, विष्णू जाधव आदी… |
स्थैर्य, सातारा, दि. 14 : शेंद्रे ता. सातारा येथील आदीवासी व कातकरी समाजातील १७ झोपड्या आगीत जळून खाक झाल्या. यामुळे १७ कुटूंबे उध्वस्थ झाली. याची माहिती मिळताच आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वैयक्तीक मदत करतानाच शासकीय मदत मिळवून देत या १७ कुटूंबांना मोठा आधार देत त्यांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
शेंद्रे येथे आदीवासी व कातकरी समाजातील काही कुटूंबांचे वास्तव्य आहे. यापैकी १७ झोपड्यांना अचानक आग लागून ही कुटूंबे रस्त्यावर आली. संसारोपयोगी साहित्य, कपडे आदी जळून खाक झाले. याची माहिती अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनंता वाघमारे आणि माजी उपसरपंच विष्णू जाधव यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि सौ. वेदांतिकाराजे भोसले यांना दिली. यानंतर सौ. वेदांतिकाराजे यांनी तातडीने जळीतग्रस्तांसाठी कपडे आणि अन्नधान्य दिले. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी वैयक्तीक त्याचबरोबर तहसीलदार यांना शासकीय मदत करण्याबाबत सुचना केल्या होत्या. त्यानुसार या कुटूंबांना आर्थिक मदत प्राप्त झाली असून त्याचा धनादेश आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते जळीतग्रस्त कुटूंबांना प्रदान करण्यात आला. ग्राममपंचायत आणि अभय सामाजिक संस्थेमार्फतही मदत करण्यात आली. यावेळी सोनू देवजी पवार, मंडलाधिकारी घोरपडे, तलाठी साबळे, ग्रामविकास अधिकारी माने, सरपंच सौ. मिना वाघमारे, उपसरपंच संतोष पोतेकर, सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.