जिल्हा बँकेमार्फत आ. शशिकांत शिंदे यांचा सत्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 17 : शशिकांतजी शिंदे यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवड झालेबद्दल सातारा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करणेत आला .बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे हस्ते शाल, पेढे व पुष्पगुच्छ देवून  शशिकांतजी शिंदे यांचा सत्कार करणेत आला.

यावेळी सदर निवडीबद्दल सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जेष्ठ संचालक, मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, संचालक व महाराष्ट्र राज्याचे सहकार, पणन मंत्री बाळासाहेब पाटील, बँकेचे अध्यक्ष, आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष सुनिल माने, संचालक आ. मकरंद पाटील, प्रभाकर घार्गे, राजेंद्र राजपुरे, नितीन पाटील, शिवरूपराजे  निंबाळकर, राजेश पाटील, अनिल देसाई, प्रकाश बडेकर, अर्जुनराव खाडे, वसंतराव मानकुमरे संचालिका कांचन साळुंखे, सुरेखा पाटील तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे  तसेच  विविध विभागांचे व्यवस्थापक यांनीही शशिकांतजी शिंदे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा बँकेचे मार्गदर्शक व संचालक ना. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, सहकार क्षेत्रात खूप आव्हाने आहेत. यशवंतराव चव्हाण साहेबांनी आखून दिलेली ध्येय, धोरणे व पुरोगामी विचार आचारणामध्ये आणत संचालक मंडळाने बँकेचे कामकाज आदर्शवत ठेवले असून बँकेचे नांव देशपातळीवर उज्वल केले आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या ग्रामीण विकासाच्या कार्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी जिल्हा बँक आज योग्य पद्धतीने कार्यरत असून आज बँकेचे सर्व कामकाज एकदिलाने चालते. शशिकांत शिंदे यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवड झालेबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेछ्या दिल्या.

बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले म्हणाले, शशिकांत शिंदे सर्वसामान्य शेतकरी सभासदांचे उन्नतीसाठी व बँकेच्या हितासाठी सतत चांगले कामकाज करणेसाठी प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेऊन त्यांच्यावर दिलेली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडतील.

बँकेचे उपाध्यक्ष सुनिल माने यांनी , नावलौकिक प्राप्त बँकेचे संचालक शशिकांत शिंदे समाजाच्या उन्नतीसाठी व कल्याणासाठी कामकाज करीत असल्याचे सांगितले व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशपातळीवर अग्रस्थानी असून, या बँकेचे विकासाभिमुख वाटचालीमध्ये अनेक दिग्गजांचा सहभाग आहे. सातारा जिल्हा बँकेचे संचालक शशिकांत शिंदे यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवड झाली ही बाब या बँकेसाठी भूषणावह आहे. शिंदे साहेबांनी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामांन्यांच्या आर्थिक विकासाकरिता नेहमीच सकारात्मक भूमिका माडली असलेचे सांगून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!