दैनिक स्थैर्य । दि.०२ मे २०२२ । फलटण । महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त येथील अधिकार गृह इमारतीच्या प्रांगणात आ. दिपकराव चव्हाण यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण व अन्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता बोडखे, नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक विधवा पत्नी व त्यांचे कुटुंबीय, शहर व तालुक्यातील पोलिस पाटील आणि शासनमान्य रास्त भाव दुकानदार, नागरिक उपस्थित होते.
राष्ट्रध्वजारोहणानंतर पोलिस व गृहरक्षक दलाच्यावतीने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. आ. दीपकराव चव्हाण यांनी पोलिस तुकडीचे निरीक्षण केले, पोलिस उप निरीक्षक सूरज शिंदे यांनी त्यांना सलामी देत स्वागत केले.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याच्यावतीने दरमहा उत्कृष्ट काम करणारे कर्मचारी आणि पोलिस पाटील यांना पुरस्कार देण्यात येतात, गेल्या ४ महिन्यातील या पुरस्कारांचे वितरण आ. दिपकराव चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक करण्यात आले. त्यामध्ये जानेवारी महिन्यासाठी पोलिस नाईक अमोल जगदाळे, गोखळी पोलिस पाटील विकास शिंदे, फेब्रुवारी महिन्यासाठी पोलिस हवालदार मोहन काळे, हणमंतवाडी पोलिस पाटील जगदीश गाडे, मार्च महिन्यासाठी पोलिस हवालदर मोहन हांगे, भवानीनगर पोलिस पाटील सौ. माधुरी पवार, एप्रिल महिन्यासाठी सहाय्यक फौजदार विलास यादव, बरड पोलिस पाटील सौ. अश्वीनी टेंबरे यांचा समावेश होता.
फलटण तहसील कार्यालयांतर्गत पुरवठा शाखेतील नायब तहसीलदार एन. डी. काळे, पुरवठा निरीक्षक
एम. जे. काकडे, उपलेखापाल के. व्ही. जाधव, पुरवठा अव्वल कारकून श्रीमती एम. के. कुंभार, गोदामपाल रमेश जगदाळे तसेच रास्त भाव दुकानदार एस. के. शेख तडवळे, बी. बी. नलवडे आळजापूर, एस. बी. जाधव सस्तेवाडी, सौ. एस. एल. काशीद जाधववाडी, अध्यक्ष क्रांती महिला मंडळ मठाचीवाडी, विडणी विकास सोसायटी, टी. बी. शिंदे तामखडा, सौ. पी. पी. भोईटे आरडगाव हे शासनमान्य रास्त भाव दुकानदार यांना प्राप्त झालेल्या आय. एस. ओ. मानांकन सर्टिफिकेट सन्मानपूर्वक प्रदान करुन वरील सर्व दुकानदार आणि पुरवठा शाखेतील अधिकारी, कर्मचारी यांना आ. दिपकराव चव्हाण यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते जिंती, ता. फलटण येथील रास्तभाव दुकानदार सुदामराव श्रीरंग ढेंबरे यांना आय एस ओ मानांकन रास्तभाव दुकान व दुकानदार म्हणून प्रमाणपत्र व पुष्पागुच्छ देऊन सातारा येथील कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.