आ. शिवेद्रसिंहराजेंकडून केळघरसह तीन गावांमध्ये फवारणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मेढा, दि. 29 : केळघर -केळघरसह वरोशी व गवडी येथे करोनाबाधित रुग्ण आढळल्याने व करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून या तीनही गावांत सॅनिटायझर फवारणी करण्यात आली.

केळघर येथे 5 व 1 वाहनचालक असे एकूण 6, गवडी येथे 2, वरोशी येथे 2 पैकी 58 वर्षीय पुरुष मयत असे एकूण तीन गावांत 10 करोनाबाधित रुग्ण आढळल्याने केळघर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. केळघरसह गवडी, वरोशी ही गावे कंटेनमेन्ट झोनमध्ये असून या गावातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वतीने संपूर्ण गाव सॅनिटायझर करण्यात आले. यावेळी केळघरचे सरपंच रवींद्र सल्लक, उद्योजक राजेंद्र धनावडे, सुनील जांभळे (नाना), बबनराव बेलोशे, अंकुश बेलोशे यांची प्रमुख उपस्थिती होती.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!