सातार्‍यात रंगले बॅनर वॉर; नगरपालिका निवडणुका जवळ आल्याने दोन्ही आघाड्यात श्रेयवाद


दैनिक स्थैर्य । दि. २३ सप्टेंबर २०२१ । सातारा । सातारा पालिकेची निवडणूक जवळ आल्याने शहरात दोन्ही आघाड्यांमध्ये श्रेयवाद सुरू झाला आहे. खासदार उदयनराजे यांनी पोवई नाक्यावर गतिमान विकासासाठी सातारा विकास आघाडी सीआरएफ निधीतून पोवई नाका ते वाढे फाटा या 15 कोटीच्या मार्गाचा शुभारंभ 22 तारखेला घेणार असल्याचे बॅनर लावले. त्यांच्या बॅनरला प्रतिउत्तर म्हणून आ.शिवेंद्रसिंहराजे यांच्या नगर विकास आघाडीने त्याच्या बाजूलाच आपला बॅनर लावत काम कुणाचं आणि नाचतय कोण? असा बॅनर लावला आहे. तसेच या बॅनरवर आ.शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार हे काम नितीन गडकरी यांनी मंजूर केल्याचे पत्रच या बॅनर वर छापले आहे व कधी तरी खरं बोला असा चिमटा काढला आहे. हे बॅनर वार बघण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली आहे.


Back to top button
Don`t copy text!