प्रोग्रेसिव कॉन्व्हेंट स्कूल व जुनिअर कॉलेज गुणवरे येथे “Colour Activity ” घेण्यात आली


दैनिक स्थैर्य । दि.०६ फेब्रुवारी २०२२ । फलटण । “सरस्वती शिक्षण संस्था संचलित” प्रोग्रेसिव कॉन्व्हेंट स्कूल व जुनिअर कॉलेज गुणवरे येथे ‘Colours Activity ‘ घेण्यात आली. सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गुणवरे ता.फलटण जि. सातारा येथे पूर्व प्राथमिक विभागात Colours Activity घेण्यात आली. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला . विद्यार्थ्यांनी विविध रंगाच्या पेपर पासून बनवलेल्या वस्तू तसेच वेगवेगळ्या रंगाचे ड्रेस परिधान करून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या उपक्रमांमध्ये एल.के.जी व यु .के .जी .च्या विद्यार्थ्यांनी सुंदर प्रकारे विविध रंगांवर आधारित कवितांचे सादरीकरण केले तसेच विद्यार्थ्यांनी निसर्ग चित्रा मध्ये विविध रंगाच्या वस्तू चिकटवून निसर्ग देखावा तयार केला. शिक्षकांनी रंगांवर आधारित खेळ ,कोडी घेऊन मुलांचे मनोरंजन केले व मुलांना रंगांची ओळख करून दिली.
या कार्यक्रमाचे आयोजन सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री.विशाल पवार सर , सरस्वती शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापिका संचालिका मा. सौ संध्या गायकवाड मॅडम, सरस्वती शिक्षण संस्थेच्या संचालिका मा.सौ प्रियंका पवार मॅडम, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे मा. श्री. प्राचार्य सुनील आहिरे सर विद्यालयाचे पर्यवेक्षक मा.श्री. किरण भोसले सर, विद्यालयाच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या समन्वयिक मा. सौ. सुप्रिया सपकाळ मॅडम यांनी केले. सौ. सुजाता गावडे मॅडम यांनी सूत्रसंचालन केले तर कु.आयेशा मुल्ला मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.


Back to top button
Don`t copy text!