जिल्ह्यात १३ ते ३० सप्टेंबर २०२२ कालावधीत कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ सप्टेंबर २०२२ । सातारा । जिल्ह्यात 13 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत कुष्ठरुग्ण शोध मोहिम व सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम 2022-23 राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत तपासणीसाठी येणाऱ्या पथकांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

या मोहिमेमध्ये सातारा जिल्ह्यातील ग्रामीण  व नागरी भागातील एकूण 27 लाख 23 हजार 192 लोकसंख्येची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी 2 हजार 768 पथके तयार करण्यात आलेली आहेत. कुष्ठरोग व क्षयरोग आजाराच्या निदानाची सोय सर्व शासकीय, निमशासकीय दवाखान्यांमध्ये मोफत केलेली आहे. निदान निश्चित झाल्यावर त्यावरील औषधोपचार देखील मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत आपल्या घरी तपासणीसाठी येणाऱ्या पथकांना तपासणीसाठी संपूर्ण सहकार्य करुन आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची तपासणी करुन घ्यावी व ही मोहिम यशस्वी करावी, असेही आवाहनही श्री. जयवंशी यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!