
स्थैर्य, सातारा दि. 1 : राज्यातील कोविड-19 समाविष्ट असलेल्या कार्यवाही करण्याबाबत दिलेल्या सुधारीत सूचना लॉकडाऊन उघडण्याच्या अनुषंगाने पुन्हा चालू मोहिम बाबत आदेश पारित केलेला आहे. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतुदीनुसार प्राप्त असलेल्या अधिकारान्वये सातारा जिल्ह्यात दि. 30 जून 2020 रोजीच्या 24 वाजेपर्यंत खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत.
ज्या ठिकाणी कोराना रुग्ण सापडतो त्या ठिकाणी कन्टांनमेंट झोन जाहिर करण्याचे अधिकार इन्सिडंट कमांडन्ट म्हणून संबंधित उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहेत. संबंधित कन्टांनमेंट झोन बाबत उपविभागीय अधिकारी हे वेगळा आदेश काढून त्या झोनमध्ये कोणत्या बाबी चालु राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वाना सूचित करतील. हा आदेश कन्टांनमेंट झोन वगळता सातारा जिल्ह्यातील इतर क्षेत्रासाठी लागू राहील तसेच कन्टांनमेंट झोनबाबत त्या त्या क्षेत्रातील इन्सिडंट कमांडन्ट यांचे अस्तित्वात असलेले आदेश हे संबंधित क्षेत्रात लागू राहतील. तसेच कन्टांनमेंट झोन इनॲक्टीव्ह झाल्यानंतर सदर क्षेत्राला हे आदेश लागू राहतील. तसेच भविष्यामध्ये जर सातारा जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळतील त्या ठिकाणी संबंधित इन्सिडंट कमांडन्ट तथा उपविभागीय अधिकारी हे सदर ठिकाणी नव्याने कन्टांनमेंट झोन जाहिर करुन वेगळा आदेश काढून त्या झोनमध्ये कोणत्या बाबी चालू राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वांना सुचित करतील.
पुढील गोष्टींना सातारा जिल्ह्यामध्ये प्रतिबंध राहील
▪ सातारा जिल्ह्यातील सर्व व्यक्तींच्या हालचाली अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा या कारणाशिवाय रात्री 9 ते सकाळी 5 या कालावधीत प्रतिबंधित करण्यात येत आहेत.
▪ 65 वर्षावरील व्यक्ती, व्याधीयुक्त व्यक्ती (Persons with comorbidities), गर्भवती महिला, 10 वर्षाखालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा वगळता घरामध्येच रहावे. त्यांना बाहेर पडण्यास प्रतिबंध राहील.
▪ सर्व शाळा कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इंस्ट्युटयुट या बंद राहतील.
▪ सर्व चित्रपट गृहे, जिम, व्यायामशाळा, सर्व मॉल व बाजारपेठ संकुल, स्विमींग पुल, एंटरटेनमेंट पार्क, थिएटर, बार्स ॲड ऑडीटोरीयम, असेंम्बली हॉल, मंगल कार्यालय व यासारख्या इतर सर्व जागा बंद राहतील.
▪ रेल्वे व विमान प्रवासी वाहतुक काही ठराविक आदेशाने मान्यता दिली असल्यास किंवा STANDARD OPERATING PROCEDURE नुसार चालू राहील.
▪ सर्व सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे व मोठया संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा बंद राहतील.
▪ सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे सर्वसामान्यांसाठी बंद राहतील.
▪ केशकर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर बंद राहतील
▪ शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट आणि हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस बंद राहतील.
पुढील गोष्टींना सातारा जिल्ह्यामध्ये चालु राहील
वर प्रतिबंधित केलेल्या सर्व बाबी सोडून आणि which are not explicity prohibited or banned या सोडून इतर सर्व दुकाने, शॉप, औद्योगिक व खाजगी आस्थापना चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे.
▪ प्रतिबंधित नसलेल्या कृती करण्यास कोणत्याही परवानगीची गरज नाही.
▪ क्रिडांगण, स्टेडीयम व इतर सार्वजनिक खुल्या जागेमध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीशिवाय व समुह विरहीत, सामाजिक अंतर ठेवून शाररिक व्यायाम व इतर क्रिया करण्यास परवानगी देण्यात येत आहे. Indoor stadium किंवा Indoor portion मध्ये कोणत्याही गोष्टीस परवानगी नाही.
▪ सर्व वैयक्तिक व सार्वजनिक वाहतुकीस पुढीलप्रमाणे परवानगी राहील – दोनचाकी वाहनांवर एक चालक, तीन चाकी वाहनात 1 + 2 व्यक्ती, चार चाकी वाहनांत 1 + 2 व्यक्ती.
▪ सुरक्षित अंतर व सफाई व्यवस्थेची खबरदारी घेऊन, विहीत केलेल्या प्रवासी क्षमतेच्या 50% क्षमतेने जिल्ह्यांतर्गत बस सेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
▪ सर्व मार्केट /दुकाने सकाळी 9 ते सांयकाळी 5 वा. या वेळेमध्ये चालू राहतील. जर गर्दी अथवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास तात्काळ बंद करण्यात येतील.
व्यक्ती व वस्तुंच्या हालचालींबाबत विशेष सूचना
▪ सर्व प्राधिकारी यांनी वैद्यकीय व्यवसायिक, परिचारिका, आणि पॅरा वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि रुगणवाहिका यांना कोणतेही प्रतिबंधाशिवाय राज्यांतर्गत व राज्याबाहेर प्रवास करण्यास मान्यता द्यावी.
▪ अंतर राज्य व अंतर जिल्हा व्यक्तीच्या वाहतुकीस निर्बंध राहतील.
▪ सर्व प्राधिकारी यांनी सर्व प्रकारच्या वस्तुंच्या अंतरराज्य वाहतुकीस मान्यता द्यावी. यामध्ये रिकाम्या वाहनांचा देखील समावेश असेल.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आरोगय सेतू या ॲपचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच हे ॲप व त्यावरील माहिती प्रत्येकाने वेळोवेळी अद्यावत करणे बंधनकारक राहील.
राष्ट्रीय व राज्य पातळीवर पुढीलप्रमाणे कोरोना प्रतिबंध उपायोजना करणे सर्वांसाठी बंधनकारक राहील
▪ सार्वजनिक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे येथे असताना चेहऱ्याचे तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर रु.500/- दंड आकारण्यात येईल.
▪ सातारा जिल्ह्यातील कोणत्याही सार्वजनिक अथवा खाजगी जागेच्या ठिकाणी थुंकण्यास मनाई असून थुंकल्यास रु. 1000/- दंड आकारण्यात येईल.
▪ जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी लोकांचा वावर असणाऱ्या खाजगी ठिकाणी तसेच वाहतुकीच्या साधनांमध्ये सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे.
▪ कोणत्याही कारणासाठी मोठया संख्येने लोकांनी एकत्र येणे यावर प्रतिबंध राहील.
▪ लग्न समारंभ या कार्यक्रमास 50 पर्यत व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम करण्यास परवानगी राहील. तथापि लोकांची गर्दी होऊ नये म्हणून संयोजकांनी काळजी घेणे गरजेचे राहील.
▪ अंत्यविधीसारख्या कार्यक्रमास 20 पर्यंत व्यक्तींना सामाजिक अंतर ठेवून कार्यक्रम करण्यास परवानगी राहील.
▪ सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, तंबाखू इत्यादी सेवन करण्यास मनाई करण्यात येत आहे.
▪ दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकात किमान 6 फुट अंतर राहील याची खात्री करावी तसेच दुकानामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्तींना घेण्यास मनाई करण्यात येत आहे. सदर आदेशाचे ग्रामीण भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रु. 500/- दंड आकारण्यात येईल. ग्रामीण भागात दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास रु. 1000/- दंड आकारण्यात येईल व तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसासाठी निलंबित करुन सदर दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल. सदर आदेशाचे शहरी भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रु. 1000/- दंड आकारण्यात येईल. शहरी भागात दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास रु. 2000/- दंड आकारण्यात येईल व तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसासाठी निलंबित करुन सदर दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल. ग्रामीण व शहरी दोन्ही भागात सदर आदेशाची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थेने करावयाची आहे.
शक्य असेल त्या ठिकाणी घरातून काम करण्यास प्राधान्य द्यावे. कामाच्या आणि व्यवसायाच्या वेळा कार्यालयामध्ये, कामाच्या ठिकाणी मार्केटमध्ये, औद्योगिक तसेच व्यावसायिक आस्थापनेमध्ये गर्दी होणार नाही अशा पध्दतीने विभागून द्याव्यात. थर्मल स्कॅनिग, हँडवॉश, सॅनिटायझर याची एन्ट्री पाँईट व एक्झिट पाँईट वर व्यवस्था करावी. कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक उपयोगाच्या जागा व सामान्य माणसाच्या वापरात येणाऱ्या सर्व जागा व वस्तू यांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करण्यात यावे. सर्व औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना यांनी त्यांचे कामगारामध्ये कामाची पाळी बदलण्याची वेळी, जेवणाचे व इतर सुट्टीचे वेळी, कामावर येताना व कामावरुन सुटताना सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे.
सदर आदेशाची अंमबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार दंडनीय / कायदेशीर कारवाई संबंधित पालिस अधिकारी / कर्मचारी यांनी करावी.