फलटण शहरामध्ये आज मतदार याद्यांचे सामूहिक वाचन : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ नोव्हेंबर २०२१ । फलटण । फलटण शहरातील सर्व प्रभागांमध्ये आज दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मतदार यादीचे सामुहीक वाचन करुन मतदार नोंदणी, वगळण बाबत अर्ज भरुन घेतले जाणार आहेत. तरी फलटण शहरातील सर्व नागरिकांनी, राजकीय प्रतिनिधींनी सदर बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केलेले आहे.

मतदार याद्यांचे सामूहिक वाचन हे फलटण नगरपरिषदेच्या प्रभागामधील मतदान केंद्रावर घेण्यात येणार आहे. सोमवार पेठ येथील कै. गंगाराम जाधव प्राथमिक विद्यामंदिर, मंगळवार पेठ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन, मलठण येथील नगरपरिषदेची बालवाडी, श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कुल व जुनिअर कॉलेज, जिंती नाका येथे श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिर, पाचबत्ती चौक येथील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सामाजिक सभागृह, कसबा पेठ येथील मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर, नगरपालिका शाळा क्र. ५ व्यंकटेश विद्यालय, स्व. यशवंतराव चव्हाण हायस्कुल, श्रीमंत राणीसाहेब सौ. लक्ष्मीदेवी नाईक निंबाळकर नगरपरिषद शाळा क्र. ८, मुधोजी क्लब येथील पूर्वमुखी इमारत व मुधोजी हायस्कुल फलटण तरी मतदारांनी आपल्या मतदार भाग क्रमांकानुसार प्रभागसभेमध्ये सहभागी व्हावे, असेही प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी स्पष्ट केलेले आहे.


Back to top button
Don`t copy text!