माऊली फाउंडेशनतर्फे १३ ऑगस्टला सामूहिक रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन

माजी नगरसेवक अनुप शहा यांना भगिनी बांधणार राख्या; उपस्थित महिलांसाठी भोजन व भेटवस्तू


स्थैर्य, फलटण, दि. ११ ऑगस्ट : फलटण येथील माऊली फाउंडेशनच्या वतीने बुधवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सामूहिक रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील दगडी पूल येथील सहस्त्रकुंड धर्मशाळा येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व महिला भगिनी माजी नगरसेवक अनुप शहा यांना राखी बांधणार आहेत. या आगळ्यावेगळ्या सोहळ्याच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि आपुलकीचे नाते जपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

यावेळी अनुप शहा यांच्याकडून राखी बांधणाऱ्या प्रत्येक भगिनीला भेटवस्तू देण्यात येणार असून, सर्वांसाठी भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. ‘आपला भाऊ अनुप भैय्या यांना राखी बांधावी’ असे आवाहन करत, शहरातील सर्व महिलांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माऊली फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!