दैनिक स्थैर्य । दि. २४ जुलै २०२२ । मुंबई । भारतीय स्वातंत्र्याला यावर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या निनित्ताने संपूर्ण देशभरात आझादी का अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. या 75 वर्ष पूर्तीचे औचित्य साधून, कृष्णामामा महाजन स्मृति प्रतिष्ठान मार्फत दापोली तालुक्यातील 75 गावांमधून राख्या संकलित करून, भारतीय सीमेवरील जवानांना त्या पाठवण्यात येणार आहेत.
आपल्या सर्व भारतीयांच्या सुरक्षा आणि सुखासाठी जे स्वतःच्या जीवाची बाजी लावून भारतीय आंतरराष्ट्रीय सीमांचे संरक्षण करतात अशा सर्व जवानांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मिहीर महाजन यांनी सांगितले. यामध्ये प्रामुख्याने तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनी, तसेच गावातील महिला भगिनी मोठ्या उत्साहाने सहभागी होताना दिसत आहेत.
या उपक्रमात स्वतःहून ज्यांना सहभागी व्हायचे असेल अशा सर्वांसाठी दि. 28 जुलै 2022 पर्यंत दापोलीमध्ये राख्या, नाव व संपर्क क्रमांकासाहित एकत्रित करण्याची व्यवस्था केलेली आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.