दैनिक स्थैर्य । दि. १५ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटणला रोटरी क्लब, आयआयएआर व गोविंद फौंडेशनच्या माध्यमातून उभे राहत असलेले कोल्ड स्टोरेज हा उपक्रम फलटण तालुक्यामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरु होईल. या नंतर फलटण तालुक्यामध्ये अनेक कोल्ड स्टोरेज उभे राहतील. कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील शेतकरी हे आपला भाजीपाला, फळे व इतर उत्पादने हि रास्त भाव मिळेपर्यंत साठवणूक करून ठेवू शकतात. त्यामुळे हे होत असलेले कोल्ड स्टोरेज हे फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्यासाठी वरदान ठरेल, असे मत गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्टसचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
फलटण – सातारा रोडनजीक मिरगाव गावच्या हद्दीमध्ये रोटरी क्लब ऑफ कोरेगाव पार्क, आयआयएआर व गोविंद फौंडेशनच्या माध्यमातून कम्युनिटी कोल्ड स्टोरेजचा भूमिपूजन समारंभ आज (दि. १५ डिसेंबर) संपन्न झाला. त्यावेळी श्रीमंत संजीवराजे बोलत होते. यावेळी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, रोटरी क्लबचे प्रांतपाल पंकज शहा, जिल्हा कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, रोटरी क्लब ऑफ कोरेगाव पार्कचे अध्यक्ष रत्नाकर शेट्टी, आयआयएआरचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.
रोटरी क्लबच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील तरडगाव येथे स्व. अप्पासाहेब चाफळकर यांच्या माध्यमातून लिफ्ट योजना सन १९८० च्या दरम्यान साकारण्यात आलेली होती. संपूर्ण देशामध्ये पोलिओचे लसीकरण हे रोटरी क्लबच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेले होते. आता फलटण तालुक्यातील शेतकर्यांच्यासाठी रोटरी क्लब हे कोल्ड स्टोरेज उभारत आहे. याचा नक्कीच फायदा हा फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना होईल व शेतकरी सुद्धा याचा फायदा करून घेतील. कोल्ड स्टोरेज मुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. शेतकरी बांधवाना त्यांच्या शेतमालाला रास्त दर मिळाल्यांनतरच आपला शेतमाल विक्री करता येईल. तोपर्यंत त्याची साठवणूक हि कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून दीर्घ काळ करणे आता शक्य होणार आहे, असेही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
रोटरी क्लब हा २५६ देशांमध्ये कार्यरत आहे. रोटरी क्लब विविध क्षेत्रामध्ये आपले काम करीत असतो. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये कृषी, जलसिंचन, शिक्षण व पर्यावरण या क्षेत्रामध्ये रोटरी क्लब कार्यरत आहे. फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेज हा प्रकल्प साकारत आहे. फलटणमध्ये सुरु झालेल्या रेल्वेमुळे शेतकऱ्यांना आपले माल हे कमी खर्चात पुण्यामुंबई मध्ये जावू शकतात. त्यांना रास्त भाव मिळेपर्यंत शेतकरी बांधव हे आपला माल हा कोल्ड स्टोरेज मध्ये साठवणूक करून ठेवू शकतात, असे मत रोटरी क्लबचे प्रांतपाल पंकज शहा यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब, आयआयएआर व गोविंद फौंडेशनच्या माध्यमातून उभे राहत असलेले कोल्ड स्टोरेज हि फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांची खरी गरज होती. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांची खरी गरज ओळखूनच फलटण तालुक्यामध्ये कोल्ड स्टोरेज हा प्रकल्प सुरु केलेला आहे. कोल्ड स्टोरेज मुळे फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतमाल हा वाया जाणार नाही. तालुक्यामध्ये आधुनिक शेती करण्यासाठी कोल्ड स्टोरेजची आवश्यकता होतीच. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामुळे फलटण तालुका हा दुष्काळी तालुका राहिला नाही. धोम – बलकवडी या प्रक्लपामुळे फलटण तालुक्याची दुष्काळी तालुका म्हणून असेलेली ओळख पुसली गेलेली आहे, असे मत फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले.
फलटण तालुक्यातील कोल्ड स्टोरेज हा उपक्रम स्तुत्य आहे. भाजीपाल्याचे फलटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन आहे. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी फलटणला सुरु होत असलेले कोल्ड स्टोरेज हे अत्यंत फायद्याचे ठरणार आहे. रोटरी क्लबने फलटण येथे कोल्ड स्टोरेज उभारण्याचा अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे. रोटरी क्लबने फलटणची केलेली निवड हि कधीही फलटणकर चुकू देणार नाहीत. फलटण तालुक्यामध्ये विविध उपक्रमशील शेतकरी आहेत. सदरील कोल्ड स्टोरेजचा फायदा हा नक्कीच उपक्रमशील शेतकऱ्यांना होईल. फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी जोड धंदा म्हणून आपल्या शेतामध्ये शेततळे उभारून त्या ठिकाणी मत्सशेती करावी. त्या साठी जिल्हा कृषी विभागाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही जिल्हा कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी यावेळेस दिली.
फलटण येथे रोटरी क्लब, आयआयएआर व गोविंद फौंडेशनच्या माध्यमातून सुमारे एक हजार मे. टन कॅपेसिटी असणारे कोल्ड स्टोरेज उभे राहणार आहे. सदरील कोल्ड स्टोरेजचे मजबूत पिलर म्हणून रोटरी क्लब, आयआयएआर व गोविंद फौंडेशन हे कामकाज करणार आहेत. सदरील कोल्ड स्टोरेज मध्ये चार विभाग असणार आहेत. त्यापैकी दोन हे ५०० मे. टन कॅपेसिटी असणारे तर दोन हे १५० मे. टन कॅपेसिटी असणारे असे विभाग राहणार आहेत. फलटण तालुक्यातील भाजीपाला, फळे, फुले व शेतमाल यांस योग्य तो रास्त भाव मिळेपर्यंत आपला शेतमाल हा साठवणूक करून ठेवता येणार आहे. याचा नक्कीच फायदा हा फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना होईल, असे मत आयआयएआरचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर शहा यांनी यावेळेस व्यक्त केले.
रोटरी क्लब हि सामाजिक संस्था असून २५६ देशांमध्ये कार्यरत असणारी सदरील संस्था आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध समाजउपयोगी उपक्रम हे सातत्याने राबिविले जात असतात. फलटण येथे रोटरी क्लब, आयआयएआर व गोविंद फौंडेशनच्या माध्यमातून उभे राहत असलेले कोल्ड स्टोरेज हे खासकरून शेतकरी वर्गासाठी फायदेशीर ठरणार आहे. तरी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी सदरील कोल्ड स्टोरेजचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे मत रोटरी क्लब ऑफ कोरेगाव पार्कचे अध्यक्ष रत्नाकर शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केले.
फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने चौधरवाडी येथील मुकुंद धनवडे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हे सौ. राजश्री शिंदे यांनी केले तर आभार गोविंद मिल्कचे महाव्यवस्थापक डॉ. शांताराम गायकवाड यांनी मानले.
सदर कार्यक्रमास फलटण तालुक्यातील विविध पदाधिकारी, शेतकरी व उद्योजक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.