
स्थैर्य, मुंबई, दि.१०: सेंट्रल पॉल्यूशन कंट्रोल बोर्ड (CPCB) ने कोक, पेप्सी आणि बिसलेरीवर 72 कोटी रुपयांचा दंड लावला आहे. हा दंड प्लास्टिक कचऱ्याच्या डिस्पोजल आणि कलेक्शनची माहिती सरकारी बॉडीला न दिल्यामुळे लावण्यात आला आहे. बिसलेरीवर 10.75 कोटी, पेप्सिको इंडियावर 8.7 कोटी आणि कोका कोला बेवरेजेसवर 50.66 कोटींचा दंड लावण्यात आला आहे.
पतंजलीवर 1 कोटींची पेनल्टी
बाबा रामदेव यांच्या पतंजलीवर 1 कोटी रुपयांची पेनल्टी लागली आहे. याशिवाय दुसऱ्या एका कंपनीवर 85.9 लाख रुपयांची पेनल्टी आहे. CPCB ने म्हटले की, या सर्वांना 15 दिवसात दंडाची रक्कम भरावी लागेल. प्लास्टिक कचऱ्याप्रकरणी एक्सटेंडेड प्रोड्यूसर रिस्पांसिबिलिटी (EPR) एक पॉलिसी मानक आहे, ज्या आधारे प्लास्टिक निर्माण करमाऱ्या कंपन्यांना त्यांच्या प्रोडक्टच्या डिस्पोजलची जबाबदारी घ्यावी लागते.
9 महीन्यात बिसलेरीचा कचरा 21 हजार 500 टन
बिसलेरीच्या प्लास्टिकचा कचरा अंदाजे 21 हजार 500 टन होता. यावर 5 हजार रुपये प्रती टन हिशोबाने दंड लागला आहे. याशिवाय, पेप्सीकडे 11,194 टन आणि कोका कोलाकडे पास 4,417 टन प्लास्टिक कचरा होता. हा कचरा जानेवारी ते सप्टेंबर 2020 दरम्यानचा आहे.