
दैनिक स्थैर्य । 24 मे 2025। सातारा । तासवडे ता. कराड एम. आय. डी. सी. तील शेतीचे खते बनवण्याचा बहाणा करणार्या सुर्यप्रभा फॉर्मकेन कंपनीतून 6 कोटी 35 लाखांचे कोकेन तळबीड पोलिसांनी जप्त केले आहे. शुक्रवारी 23 रोजी ही घटना ह उघडकीस आली असून कमालीची गोपनीयता पाळून तळबीड पोलीसांनी 1270 ग्रॅम कोकेन जप्त केले असून पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तासवडे एम आयडीसीतील बी- 56 ब्लॉकमध्ये ही कंपनी असून येथे विक्रीच्या दृष्टीने सदरचे कोकेन बाळगल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईने तासवडे एम आयडीसीतील काळे धंदे चव्हाट्यावर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तासवडे एमआयडीसी येथील 21 मे रोजी सायंकाळी 4.25 च्या सुमारास तासवडे हद्दीत अमरसिंह जयवंत देशमुख राहणार नांदगाव ता. जि. सातारा यांच्या मालकीचे सूर्यप्रभा फार्म केम कंपनीत 6 कोटी 35 लाख रुपये किमंतीचे 1270 ग्रॅमच्या कोकेन विक्री करण्याचे उद्देशाने बेकायदेशीर रित्या कंपनीत मिळून आले. कंपनी मालक अमरसिंह जयवंत देशमुख राहणार नांदगाव, समीर सुधाकर पडवळ राहणार वृंदावन सिटी मलकापूर कराड, रमेश शंकर पाटील राहणार मल्हारपेठ ता. पाटण, जीवन चंद्रकांत चव्हाण रा. आवार्डे ता. पाटण, विश्वनाथ शिपणकर रा. दौंड जिल्हा पुणे यांच्याविरुद्ध अंमली औषधी द्रव्य अधिनियम 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तासवडे एमआयडीसी येथील 21 मे रोजी सायंकाळी 4.25 च्या सुमारास तासवडे हद्दीत अमरसिंह जयवंत देशमुख राहणार नांदगाव ता. जिल्हा सातारा यांच्या मालकीचे सूर्यप्रभा फार्म केम कंपनीत 6 कोटी 35 लाख रुपये किमंतीचे 1270 ग्रॅमच्या कोकेन विक्री करण्याचे उद्देशाने बेकायदेशीर रित्या कंपनीत मिळून आले. कंपनी मालक अमरसिंह जयवंत देशमुख राहणार नांदगाव, समीर सुधाकर पडवळ राहणार वृंदावन सिटी मलकापूर कराड, रमेश शंकर पाटील राहणार मल्हारपेठ ता. पाटण, जीवन चंद्रकांत चव्हाण रा. आवार्डे ता. पाटण, विश्वनाथ शिपणकर रा. दौंड जिल्हा पुणे यांच्याविरुद्ध अंमली औषधी द्रव्य अधिनियम 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की तळबीड पोलीस प्लॉट नंबर बी. 56 येथे पेट्रोलिंग करत असताना सुरक्षितता व नियमावलीनुसार कामकाज होत नसल्याबाबत माहीती मिळाली. संशय बळावल्याने तळबीड पोलीस ठाण्याचे सपोनि किरण भोसले यांनी पथकासह बी 56 मधील सूर्यप्रभा कंपनीत काहीतरी संशयास्पद केमिकल होत असल्याची पाहणी केली. तेथील संशयित पदार्थ ताब्यात घेतला. सदर कंपनीत शेतीसाठी लागणारे औषधे तयार केले जातात असे सांगितले जाते होते. त्यानंतर सहाय्यक पोलीस किरण भोसले यांनी पथकासमवेत कंपनीत जाऊन तपासणी व पंचनामा केला असता तेथे फिनिक्स ऍसिटिक ऍसिड असल्याचे सांगण्यात आले. कपाटात प्लास्टिकच्या चार पिशव्याची पाहणी केली असता त्यामध्ये स्फटिक सारखा पदार्थ आढळून आला. या संदर्भात पोलिसांनी विचारणा केल्या असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. या कपाटात पांढरा पिवळसर रंगाचा स्पटिक सारखा पदार्थ आढळून आल्याने पोलीसांनी ताब्यात घेवून चौकशी केला असता ते कोकेन असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्याचे वजन 1370 ग्रॅम असून सदरचे कोकेन 6 कोटी 35 लाखाचे असल्याचे पोलीसांनी सांगितले. पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येत आहे.