
स्थैर्य, कातरखटाव, दि.१५: महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 152 अ मध्ये दुरूस्ती करन्यात यावी अशी मागणी सहकार खात्याचे सेवानिवृत्त अधिकारी तथा माण तालुका खादी ग्रामोदयोग चे अध्यक्ष सी. के. उर्फ पोपटराव आवळे -पाटील यांनी सहकार आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनाचा आशय असा :कोणत्याही सहकारी संस्थेची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचा निवडणूक उमेदवारी अर्ज ना मंजुर झाल्यावर निबंधकाकडे अपिल दाखल करणेस तीन दिवस कालावधी दिलेला आहे तर निबंधकांनी संबंधीत अपिलावर सात दिवसात निर्णय द्यावा अशी तरतूद कलम 152 अ मध्ये करण्यात आली आहे.ज्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज ना मंजुर झाला आहे अशा व्यक्तीस अपिल करण्यास तीन ऐवजी सात दिवसाचा तर निबंधकांना अपिलवर निर्णय घेण्यास तीन दिवसाचा कालावधी देण्यात यावा अशी दुरूस्ती करण्यात यावी तसेच सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम मंजुर करताना उमेदवारी अर्ज छानणी नंतर निवडणूक अधिकाऱ्याचे कामाचे पुढील तीन दिवस सतत असावेत पुढील कालावधी मध्ये कार्यलयास सुटी नसावी अशा सूचना निबंधकांना देण्यात याव्यात असे निवेदनात म्हटले आहे.