सहकार क्षेत्राचा मार्गदर्शक हरपला – चंद्रकांतदादा पाटील यांनी शंकरराव कोल्हे यांना अर्पण केली श्रद्धांजली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ मार्च २०२२ । मुंबई । सहकार आणि शिक्षण क्षेत्रात असमान्य कामगिरी करणारे अभ्यासू नेते व माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या निधनाने राज्याच्या सहकार क्षेत्राचा मार्गदर्शक हरपला आहे, अशी श्रद्धांजली भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी अर्पण केली.

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, शंकरराव कोल्हे यांची सरपंच ते राज्याचा कॅबिनेट मंत्री आणि सहा वेळा विधानसभा सदस्य अशी विलक्षण राजकीय कारकीर्द होती. त्यांनी सदैव सहकार, शिक्षण व  पाणी प्रश्न यासाठी कार्य केले. त्यांनी अनेक सहकारी संस्था उभ्या केल्या व सक्षमपणे चालविल्या. काळाची पावले ओळखून सहकार क्षेत्रात विविध कल्पक उपक्रम राबविले, जे राज्यासाठी दिशादर्शक ठरले. ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण सुविधा उपलब्ध करण्यासाठी त्यांनी शैक्षणिक संस्था सुरू केल्या. पाणी प्रश्नासाठी त्यांनी सदैव लढा दिला. त्यांचे जीवन शेतकऱ्यांसाठी समर्पित होते. आपण त्यांना भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.


Back to top button
Don`t copy text!