यंत्रमाग व्यवसायाला व्याज सवलत देण्याचे सहकार बँकांना आदेश द्यावे – स्वाभिमानिचे अध्यक्ष राजू शेट्टी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कोल्हापूर, दि. ०७ : साधे यंत्रमाग, वायडिंग, सायझिंग, प्रोसेस, अ‍ॅटोलूम इ. वस्त्रोद्योगातील घटकांना व्याज दराच्या सवलत योजनेची अंमलबजावणी होणेसाठी सहकारी बँकांना आदेश करणेत यावेत अशी मागणी माजी खा. राजू शेटटी यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली.

कोविड 19 च्या संकटाने जगभर थैमान घातले आहे. भारतातही कोरोना व्हायरसाच्या प्रभावाने जनता जीवाच्या आकांताने भयभित झाली आहे. अशा भयंकर परिस्थितीत सरकार व प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करीत आहे. आपल्या सतर्क व सक्षम प्रयत्नाने जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे.

नैसर्गिक आपत्तीच्या काळात विविध उपाय योजनांनी परिस्थिती नियंत्रणात आणणे हे जसे महत्वाचे तसे विस्कळीत झालेले जनजीवन व उद्योग-व्यापार सुरळीत करून ते पुर्वपदावर आणणेही तितकेच महत्वाचे व गरजेचे आहे. या आपत्तीच्या काळात संचारबंदी, लॉकडाऊनचे आदेश देणेत आले. यामुळे सर्व उद्योगधंदे, व्यापार जिथल्या तिथं ठप्प झाले. पॉवरलुमच्या चक्रावर चालणा-या वस्त्रनगरीची जनता हतबल झाली. यात पॉवरलुमधारकांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले व अजूनही होत आहे. गेल्या काही वर्षापासून मंदी, महागाईमुळे पॉवरलुम उद्योग मेटाकुटीस आला असतानाच या कोरोनाने धंद्याची व उद्योजकांची अक्षरश: वाट लावली आहे.

लॉकडाऊनच्या काळात सरकारने उद्योगाला मदत म्हणून बँक कर्जांचे 6 महिन्यांचे हप्ते न भरण्याचा शासन निर्णय (जीआर) केला. लघु उद्योग सक्षमीकरण व विस्तारीकरणासाठी शासन कमीतकमी व्याज दराने कर्ज पुरवठा करीत असते. सध्या दुग्ध व इतर उद्योगाला 11.25 दराने कर्ज दिले जात होते सद्यपरिस्थितीत बॅकांनी व्याज दर कमी करून 8.25% व्याज दर करून उद्योगाला आधार दिला आहे . वस्त्रोद्योग हा ही लघुउद्योगच आहे. शेतीबरोबर सर्वात जास्त रोजगार देणारा, विविध करांतून शासनाला हजारो करोडोंचा महसूल देणारा व निर्यातीतून मोठ्या प्रमाणात परदेशी चलन मिळवून देणा-या या लघु उद्योगाला आता कमीतकमी व्याज दराने कर्ज पुरवठा करणेची गरज आहे. आपण या सर्व परिस्थितीचा गांभिर्याने व सकारात्मक विचार करून या वस्त्रोद्योगाला त्याच्या पडत्या काळात सावरणेसाठी विणकर समाजातील साधे यंत्रमाग, वायडिंग,सायझिंग,प्रोसेस, अ‍ॅटोलूम इ.वस्त्रोद्योगातील घटकांना व्याज दरात सवलत योजनेची अंमलबजावणी करणेबाबत सहकारी बॅंकाना आदेश करण्याची मागणी केली.

यावेळी प्रमोद मुसळे,अमोल डाके, प्रशांत सपाटे, विकास चौगुले, किरण पवार , आण्णा दबडे यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!