गृहनिर्माण सोसायट्यांनी निर्बंध घालू नयेत, केंद्रांनी व राज्यांनी घालून दिलेले नियम पाळावेत – सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि. 18 : लॉकडाऊनच्या काळात जनतेने रस्त्यावर न येता चांगला प्रतिसाद दिला. आज लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिली असून काही गृहनिर्माण सोसायट्या अनावश्यक पणे काही निर्बंध लादत आहेत. तरी गृह निर्माण सोसायट्यांनी केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

मुंबई, पुणे तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये मोठ मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत. या सोसायट्यांमध्ये वयोवृद्ध लोक राहतात त्यांच्या घरी स्वयपाक करण्यासाठी बाहेरील महिला येतात त्यांना प्रवेश दिला जात नाही. तसेच दूध, भाजीपाला पुरवठा करणाऱ्यांना आणि कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना गृह निर्माण सोसायटी चेअरमन, संचालक मंडळ अनावश्यक पणे निर्बंध घालत आहे. तरी राज्यातील सर्व गृह निर्माण सोसायट्यांनी केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असेही आवाहन सहकार मंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!