कॉ.अरविंद मुळ्ये यांचे निधन


स्थैर्य, सातारा, दि.२२: सातारा येथील विमा कामगार संघटनेचे संस्थापक , सक्रिय पुढारी कार्यकर्ते व नेते कॉ अरविंद नारायण मुळ्ये (वय ८३) यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज ( दि.२२) संगममाहुली येथे सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी , मुलगा रंगकर्मी व पत्रकार राजीव मुळ्ये , विवाहित मुलगी रेवा , सुन , जावई , नातवंडे असा परिवार आहे. त्यांना कॉ अरविंद मुळ्ये को लाल सलाम , कॉ अरविंद मुळ्ये अमर रहे अशा शब्दात अखेरचा निरोप देण्यात आला. संगममाहुली येथे सुजित शेख व विजय मांडके यांनी कॉ अरविंद मुळ्ये यांच्या वीमा कामगार संघटनेने च्या , तसेच सामाजिक कार्यासंदर्भात माहिती सांगुन आदरांजली वाहिली. वीमा कामगार संघटनेच्या बळकटीकरणासाठी त्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक आपल्या सहकाऱ्यांचे सहाय्याने बांधणी केली होती. विमा कर्मचाऱ्यांची डाव्या विचाराबरोबर जुळणी व्हावी यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असत.


Back to top button
Don`t copy text!