दैनिक स्थैर्य । दि. ०८ सप्टेंबर २०२२ । लोणंद । खंडाळा तालुक्यातील लोणंद या ठिकाणी लोणंद – फलटण रस्त्यावर असणार्या अंबिका पेट्रोलियम येथे सीएनजी पंप उद्यापासून आज दि. 8 सप्टेंबर 2022 पासून सुरू होणार असल्याची माहिती सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.
सीएनजी हा एक नैसर्गिक वायू आहे. या वायू चा वापर रिक्षा, बस, कार मध्ये इंधन म्हणून केला जातो. वाहनात एक गॅसच्या टाकी सारखी टाकी असते, त्यात हा CNG गॅस भरलेला असतो व त्याद्वारे वाहन चालवले जाते. सीएनजी गॅस हा पर्यावरणास हानी पोहोचवत नाही, यामुळे सरकार सुद्धा CNG चा वापर करावा असे आवाहन करते.
पेट्रोल व डिझेल सारख्या भयंकर प्रदूषण करणाऱ्या वायूच्या ऐवजी CNG Gas वापरला जाऊ शकतो, वापरला जातो. जगभरात या वायू चा वापर खूप वाढला आहे.
CNG चा फुल फॉर्म “Compressed Natural Gas” असा होतो व मराठी अर्थ “संकुचित नैसर्गिक वायू” असा होतो. CNG ला Ideal Fuel असे म्हणतात कारण हा गॅस जवळपास पूर्णपणे Burn होतो, यातून प्रदूषण करणारे वायू बाहेर पडतात परंतु त्यांचे प्रमाण खूप कमी असते. पेट्रोल व डिझेल च्या ज्वलन प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोक्साईड, आणि नायट्रोजन ऑक्साईड्स वायू उत्सर्जित होतात, जे पर्यावरणासाठी खूप विनाशकारी आहेत.