फलटणमध्ये आज एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार! अनिकेतराजेंच्या प्रचारासाठी दुपारी ३.३० वाजता गजानन चौकात सभा. वाचा संपूर्ण दौरा…


  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज फलटण दौरा

  • दुपारी ३:२० वाजता हेलिकॉप्टरने होणार आगमन

  • गजानन चौक येथे अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्यासाठी जाहीर सभा

स्थैर्य, फलटण, दि. २८ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत आज (शुक्रवारी) राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची आज फलटणमध्ये तोफ धडाडणार आहे. शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ गजानन चौक येथे ही भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे.

असा आहे मुख्यमंत्र्यांचा दौरा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा दौरा निश्चित झाला आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर येथील सभा आटोपून ते हेलिकॉप्टरने फलटणकडे रवाना होतील.

  • दुपारी ३:२० वा. : फलटण हेलिपॅडवर आगमन.

  • दुपारी ३:३० वा. : गजानन चौक येथील सभास्थळी आगमन आणि सभेला संबोधित करतील.

  • सभेनंतर: कराड येथील नियोजित सभेसाठी ते मार्गस्थ होतील.

अनिकेतराजेंसाठी लावणार ताकद

विधानपरिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून, ते धनुष्यबाण चिन्हावर नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री स्वतः मैदानात उतरले असल्याने या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गजानन चौकात होणाऱ्या या सभेत मुख्यमंत्री काय बोलणार आणि विरोधकांचा (भाजप) कसा समाचार घेणार, याकडे संपूर्ण फलटणकरांचे लक्ष लागले आहे.


Back to top button
Don`t copy text!