पालिकेच्या लेखा विभागाचा रात्री दीड वाजता क्लोजिंग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०३ एप्रिल २०२२ । सातारा । सातारा पालिकेच्या लेखा विभागाने मार्च एण्डची गडबड रात्री दीड वाजता संपविल्याचे वृत्त आहे. नवीन आणि जुन्या रकमांची वर्गावर्गी आणि जुन्या देण्यांचा तपशील पूर्ण करून मार्च एंडचे क्लोजिग होण्यास कर्मचाऱ्यांना मध्यरात्र उजाडली. पालिकेच्या या मॅरेथॉन कामाचे कौतुक होत आहे असून लेखा विभागाला यंदा 19 कोटीचा महसूल प्राप्त झाला आहे.

सर्वच शासकीय कार्यालयाने मार्च एंडच्या कामाच्या सुटकेचा निश्वास टाकला आहे .अगदी राष्ट्रीयकृत बँकांनी सुद्धा नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला दोन दिवसाचा कॉमन ऑफ घेतला आहे. सातारा पालिकेच्या लेखा विभागाने सुद्धा आपला मार्च एण्ड शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजता उरकल्याचे खात्रीशीर वृत्त आहे 31 मार्च अखेर पालिकेच्या तिजोरीमध्ये 19 कोटी 76 लाख जमा झाले आहेत. यामध्ये सातारकरांना एक लाख 84 हजार 665 रुपयांची सूट देण्यात आली आहे. लेखा विभागातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मालमत्ता कराचे दहा कोटी 90 लाख, विशेष शिक्षण करायचे चार कोटी सात लाख, वृक्ष करापोटी 34 लाख, वॉरंट बजावणे कामी आठ हजार सहाशे रुपये, थकीत रकमेवरील शास्ती दोन कोटी दहा लाख रुपये, विशेष स्वच्छता कर एक कोटी वीस लाख रुपये, अग्निशमन कर पंधरा लाख 66 हजार रुपये, इमारत जागा वापरा पोटी 1 कोटी 65 लाख रुपये असे मिळून 19 कोटी 72 लाख पालिकेला प्राप्त झाले आहेत.
यंदा पालिकेला 52 कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट होते. यामध्ये चालू मागणी 14 कोटी तर मागील थकबाकी 38 कोटी रुपयांची होती पालिकेने 19 कोटीची वसुली केली तरीही वसुली मूळ उद्दिष्टाच्या -32 टक्के आहे. मात्र यापुढेही सातारा पालिकेची मोहीम सुरूच राहणार असून या कारवाया थांबलेल्या नाहीत असे अतिरिक्त मुख्य अधिकारी पराग कोडगुले यांनी स्पष्ट केले आहे लेखा विभागाने मागील थकबाकी एकूण देय रक्कम अखेरची शिल्लक तसेच आगामी खर्चांची आकडेवारी याचे अंदाज पत्रक तयार ठेवले आहे नवीन आर्थिक वर्षांमध्ये येणाऱ्या खर्चाची आकडेवारी जुळवली जात आहे या कामांमध्ये मुख्याधिकारी अभिजित बापट व पालिकेच्या मुख्य लेखाधिकारी आरती नांगरे पाटील सहाय्यक लेखाधिकारी हिंमत पाटील लिपिक भालचंद्र डोंबे लेखापरीक्षक कल्याणी भाटकर यांनी अत्यंत कुशलतेने काम करत लेखा विभागाचे काम कुशलतेने पार पाडले . पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रात्री दीड वाजेपर्यंत केलेल्या मेहनतीचे कौतुक होत आहे.


Back to top button
Don`t copy text!