
स्थैर्य, वावरहिरे, दि.९: वावरहिरे ता.माण येथील असणार्या आईडीबीआय बॅकेच्या एटीएमची सेवा गेली दोन अडीच महिने बंद असल्याने बॅकेच्या ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे.वावरहिरे हे गाव आसपासच्या बारा वाड्यावस्त्याचे मुख्य ठिकाण असल्याने या गावात वाड्यावस्त्यावरील लोकांचे तलाठी कार्यालय,बॅका,पोस्ट आॅफिस, दवाखाना, मेडीकल, रेशनदुकान,किराणामाल तसेच दैनदिन जीवनात उपयोगी येतील अशा वस्तु खरेदी तसेच शेतीसाठी लागणारे खते- बियाणे खरेदी करण्या साठी सतत ये-जा होत. असते.परंतु येथील आईडीबीआय बॅकेची एटीएम सेवा बंद असल्याने वावरहिरे परिसरातील बॅकेचे ग्राहक ,जेष्ठ नागरिक,महिलावर्ग यांची मोठी गैरसोय होत आहे . कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीला एकीकडे रोखण्यात यावे म्हणुन प्रशासन प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे बॅक प्रशासनाने एटीएमकडे दुर्लक्ष केल्यामुळे पैसे काढण्यासाठी बॅकेत गर्दी होत अाहे .सुट्टीच्या दिवशी बॅक बंद असल्याने किरकोळ तसेच अडचणीच्या कामासाठी पैसे काढण्यासाठी गावापासुन बारा किलोमीटर दुर अंतरावर असणार्या दहिवडी,किंवा शिंगणापुर येथील असणार्या एटीएम चा आधार घ्यावा लागत असल्याचे वेळ आणि आर्थिक भुर्दड सोसावा लागत आहे.बॅकेत गर्दी न करता जलद पैसे काढण्यासाठी एटीएमचा चांगला उपयोग होत असतो. परंतु येथील बंद एटीएममुळे जेष्ठ नागरिक,महिलावर्गाची मोठी गैरसोय होत असुन बॅक प्रशासनाने बंद पडलेली एटीएमची सुविधा तात्काळ सुरु करुन नागरिकांची होणारी गैरसोय दुर करावी अशी मागणी परिसरातील बॅकेचे ग्राहक, जेष्ठ नागरिक,महिलावर्ग व ग्रामस्थांमधुन होत आहे.