स्थैर्य, फलटण, दि.२८: फलटण शहरात व तालुक्यामध्ये कोरोनाने थैमान घातलेले आहे. कोरोनाचे रोज नवीन रुग्ण फलटण शहरात व तालुक्यात सापडत आहेत. तरी बारामतीच्या धर्तीवर फलटण बंद करावे, अशी मागणी व्यापार्यांमधून पुन्हा जोर धरू लागलेली आहे.
पुढील काही दिवसांमध्ये दसरा व दिवाळी सण आलेला आहे. तरी दसरा व दिवाळीमध्ये व्यवस्थित व्यवसाय होण्यासाठी व सर्वांना दसरा व दिवाळी हे सण सुखाने समृद्धिचे आनंदाने आपल्या घरामध्ये नांदण्यासाठी सद्य परिस्थितीमध्ये फलटण तालुका हा पूर्णतः लॉकडाउन करणे गरजेचे आहे, असे मत काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेले आहे.
बारामती मध्ये पूर्णतः लॅाकडॉऊन केल्यानंतर कोरोनाच्या केसेस होण्याची संख्या निम्म्याहून कमी वर आलेली आहे. तरी बारामती प्रमाणेच फलटण तालुक्यामध्ये लॅाकडाऊन करून आपल्या तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी करण्यासाठी व कोरोनाचे सद्यस्थितीत असलेल्या सर्व साखळ्या तोडण्यासाठी लॅाकडाऊन करणे गरजेचे आहे, असेही व्यापार्यांमधुन बोलले जात आहे.