दैनिक स्थैर्य | दि. ३० मार्च २०२३ | फलटण |
फलटण शहरातून काल स्वच्छता रॅली काढण्यात येऊन शहर कचरामुक्त करण्यात आले. या रॅलीत महिलांचा सहभाग मोठा होता. ही मोहीम ‘स्वच्छोत्सव’ निमित्ताने फलटण शहरात राबविण्यात आली. या मोहिमेचे शहरातील सर्व नागरिकांनी अभिनंदन केले आहे.
फलटण शहरात बुधवार, दि. २९ मार्च रोजी सकाळी १०.४५ वाजता ‘स्वच्छोत्सव’ निमित्ताने ‘महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग व त्यांचे नेतृत्व वृद्धिंगत करणे’ या उद्देशाने स्वच्छतेमधील झालेले संक्रमण साजरे करण्याकरीता तसेच फलटण शहर ‘कचरा मुक्त शहर स्वच्छ व सुंदर चाकूर’ करण्यासाठी स्वच्छता मशाल मार्च-स्वच्छता रॅली काढण्यात आली. या रॅलीत सहभागी सर्वांना ‘स्वच्छता शपथ’ देण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत नगर परिषदेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.