“एक तास, एक साथ” अभियानांतर्गत फलटण नगरपरिषदेत स्वच्छता श्रमदान संपन्न


स्थैर्य, फलटण, दि. २६ सप्टेंबर : ‘स्वच्छता ही सेवा’ या देशव्यापी मोहिमेअंतर्गत, “श्रमदान – एक दिवस, एक तास, एक साथ” या घोषवाक्याला अनुसरून आज, शुक्रवार, दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता फलटण नगरपरिषदेच्या कार्यालय परिसरात स्वच्छता श्रमदान अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानात नगरपरिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता पंधरवडा’ साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेने हे श्रमदान अभियान राबवले. मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेत नगरपरिषदेचे विविध विभाग प्रमुख, अधिकारी आणि सफाई कर्मचारी सहभागी झाले होते.

यावेळी कार्यालय परिसरातील सर्व भागाची स्वच्छता करण्यात आली. या कामासाठी नगरपरिषदेकडील २ ट्रॅक्टर आणि १ क्रेनचा वापर करण्यात आला. ‘स्वच्छ फलटण, सुंदर फलटण, हरित फलटण’ हे ध्येय साध्य करण्यासाठी सर्व नागरिकांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.


Back to top button
Don`t copy text!