दैनिक स्थैर्य । दि. २४ जुलै २०२२ । बारामती । बारामती एमआयडीसीतील बँक ऑफ महाराष्ट्र याठिकाणी ग्राहकांना नियमित सेवा मिळत नसल्याबदल व अधिकारी व कर्मचारी नेहमी उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने बँकेचे ग्राहक संताप व्यक्त करीत आहेत.
बँक ऑफ महाराष्ट्रा च्या एमआयडीसी शाखेमध्ये एमआयडीसी बरोबर,रुई तांदुळवाडी, जळोची, वंजारवाडी, कटफळ, साबळेवाडी गाडीखेल, येथील नागरिक व विद्या प्रतिष्ठान चे विद्यार्थी ग्राहक म्हणून येत असतात परंतु नेहमी सर्व्हर बंद आहे, वीज केली आहे,संगणक यंत्रणा बंद आहे हे तांत्रिक मुद्दे घेऊन ग्राहकांना सेवा दिली जात नाही तक्रार घेऊन अधिकारी कडे गेल्यावर स्टाफ कमी आहे त्यामुळे सेवेस विलंब लागत आहे आमची तक्रार मुख्य शाखा पुणे येथे खुशाल करा त्यासाठी नंबर व पत्ता देतो असे सांगितले जाते.
नेहमी या शाखेत मोठी गर्दी असते परंतु ग्राहकांना सेवा देताना दुजाभाव केला जातो ज्यांचा वशिला आहे त्यांची कामे लगेच केली जातात असाही आरोप विद्या प्रतिष्ठान च्या विद्यार्थ्यांनी केला आहे. फी भरण्यासाठी 2 दिवस मुदत असताना रांगेत उभे राहत आहे अचानक सर्व्हर डाऊन आहे म्हणून बँकेच्या बाहेर काढून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप प्रा महेश शिंदे यांनी सांगितले
स्टाफ कमी असेल तर भरती करा व तांत्रिक दोष दूर करून उत्कृष्ट सेवा द्या कारण एमआयडीसी मधील अनेक छोट्या मोठ्या कंपन्यांच्या अधिकारी व कामगारांचे व्यवहार या बँकेत आहे वरिष्ठाकडे तक्रार तर करू व बँकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा सुयश ऑटो कामगार सेनेचे अध्यक्ष भारत जाधव यांनी दिला आहे. दरम्यान बॅंकेच्या वतीने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.