दैनिक स्थैर्य । दि. १३ डिसेंबर २०२२ । मुंबई । ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने ऑडी क्लब रिवॉर्ड्स उपक्रमांतर्गत संपूर्ण भारतातील १५० हून अधिक भागीदारांची यशस्वीरित्या नियुक्ती केली आहे. काही सूचीबद्ध भागीदार ब्रॅण्ड्स आहेत, अजिओ ल्यूक्स, ट्रूफिट अॅण्ड हिल, ऑबेरॉय हॉटेल्स, मॉण्ट ब्लँक, लक्झरी चार्टर्स बाय एव्हियॉन प्राइव्ह, पुलमॅन हॉटेल, रोसीट हाऊस, कोस्टा क्रूझ, इवोकस, नेप्पा डोरी, इक्का दुक्का, माशा आर्टस्, टेलरमेड आणि लक्झरी एफएनबी विथ शेफ गौतम चौधरी. ऑडी ग्राहक ऑडी क्लब रिवॉर्ड्स-नेतृत्वित क्यूरेटेड अनुभव, विशेष हॉलिडेज, लक्झरी शॉपिंगच्या माध्यमातून अद्वितीय लक्झरीचा अनुभव घेऊ शकतात.
ऑडी क्लब रिवॉर्ड्स अद्वितीय रिवॉर्ड्स उपक्रम आहे, जो या वर्षाच्या सुरूवातीच्या सुरू करण्यात आला. हा उपक्रम विशेष उपलब्धता, सेगेमेंट-फर्स्ट विशेषाधिकार व सर्वोत्तम अनुभव देतो. ऑडी क्लब रिवॉर्ड्स सर्व विद्यमान मालक (ऑडी अप्रूव्ह्ड’ प्लस मालकांसह) आणि ऑडी इंडियाच्या भावी ग्राहकांसाठी खुले आहेत.
ग्राहकांना अनेक विशेष सदस्य उत्पादने व सर्विसेससह ‘मायऑडी कनेक्ट’ अॅप्लीकेशनवर कमावलेल्या रिवॉर्डसच्या सुलभ पारदर्शक व्ह्यूचा लाभ मिळतो, जो ऑडी इंडिया उत्पादन किंवा सर्विस खरेदीवर वापरता येऊ शकतो. ऑडी क्लब रिवॉर्ड्स सदस्यांना विशेष प्रीव्ह्यूज आणि आधुनिक मोहिम व ऑफर्सची उपलब्धता मिळते. या लाभांमध्ये ऑडी इकोसिस्टम व भागीदार ब्रॅण्ड्सकडून खर्च व बर्निंगमधून कमाईचा समावेश आहे. भागीदारांच्या ऑफरिंग्ज ऑफर्सच्या पलीकडे जातात आणि त्यामध्ये विशेष आमंत्रण ते भागीदार इव्हेण्ट्सचा समावेश आहे. ऑडी इंडियाला ऑडी क्लब रिवॉर्डसच्या प्रादेशिक बैठकांमध्ये सर्वसमावेशक सहभाग दिसण्यात आला, ज्यामुळे भागीदार उत्पादने व सर्विसेसना अधिक एक्स्पोजर मिळाला आहे.
मायऑडी कनेक्ट अॅपमध्ये आता विशेष गेमिफिकेशन सेक्शनसह अतिरिक्त मनोरंजन व सहभागाचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये ऑडी क्लब रिवॉर्डसच्या सदस्यांसाठी अनेक रिवॉर्डसचा (पार्टनर वाउचर्स आणि विशेष ऑडी मर्चंडाइज) समावेश आहे.