
दैनिक स्थैर्य । 8 मे 2025। सातारा । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत राज्यातील सर्व बसस्थानकात हिंदुहृदयसम्राट बाळासाहर ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबविले जात आहे. त्यानुसार सातारा विभागातील सर्व बस स्थानकांचे समितीमार्फत स्वच्छता ऑडिट केले जाणार आहे. दि. 5 ते 15 मेअखेर समितीमार्फत बसस्थानकांची पाहणी करून मूल्याकन अहवाल कार्यालयास सादर केला आणार आहे.
या अभियानानुसार सर्वच बस स्थानकांचे दर तीन महिन्यांनी मुल्याकंन करण्यात येणार आहे. स्वच्छता अभियानाचे पहिले सर्वेक्षण दि. 5 ते 15 मे या कालावधीत होणार आहे.
सातारा विभागातील अ वर्ग बस स्थानकाचे मूल्यांकन प्रादेशिक मुल्यांकन समिती करणार असून ब आणि क वर्ग बस स्थानकांचे मूल्यांकन कोल्हापूर विभागातील मूल्याकंन समितीमार्फत दि. 7 ते 13 में दरम्यान करण्यात येणार आहे. बस स्थानकाची सखोल स्वच्छता, स्वच्छतागृहांची स्वच्छता, कर्मचार्यांचे गणवेश, हरित बस स्थानक इत्यादीबाबत सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यांच्या गुणांकांची नोंद समितीमार्फत केली जाणार आहे.
हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व बस स्थानकांचे समितीमार्फत स्वच्छता ऑडिट करून त्यानुसार गुणाकांची नोंद केली जाणार आहे. प्रवाशाला जास्तीत सोयी सुविधा देण्यासाठी सातारा आगारामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील उंब्रज, चाफळ, पाटण, कोयनानगर, ढेबेवाडी, तारळे, सातारारोड, वाठार स्टेशन, लोणंद, पारगाव खंडाळा, शिरवळ, भुईज काशिळ, अतीत, राजवाडा, पाचवड, पाचगणी, महाबळेश्वर, मेढा, रहिमतपूर, औंध, पुसेसावळी, मायणी, वडूज, दहिवडी, म्हसवड, शिंगणापूर, कोरेगाव व मसूर या बसस्थानकांचे समितीमार्फत मूल्यांकन होणार आहे.