स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत फलटण नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता व श्रमदान अभियान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३१ जानेवारी २०२३ । फलटण । स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत फलटण नगरपरिषदेच्या वतीने प्रभाग क्रमांक १० मध्ये स्वच्छता श्रमदान अभियान राबविण्यात आले होते. त्यामध्ये दगडी पूल, कैकाडवाडा, गवळीवाडा, हनुमाननगर, बापूदासनगर, बारस्कर गल्ली, ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर यांच्यासह प्रभागामधील विविध ठिकाणी राडारोडा उचलणे, झाडीझुडपे काढणे, कचरा उचलणे अशी स्वच्छतेची कामे करण्यात आली. तसेच गजानन चौक येथे स्वच्छता संदेश देण्यासाठी जनजागृती मोहिमे अंतर्गत पथनाट्य सादर करण्यात आले.

स्वच्छता श्रमदान मोहिमेत मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड, माजी नगरसेवक अजय माळवे, नगरअभियंता पंढरीनाथ साठे, कार्यालयिन निरिक्षक मुस्ताक महात, स्वच्छता निरिक्षक विनोद जाधव, प्रकाश तुळसे, अमरसिंह खानविलकर, बापू देशमुख, सनी शिंदे, राजाभाऊ देशमाने, राहुल शहा, तात्या तेली, नाना पवार, सर्जेराव विद्वांस यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

माझी वसुंधरा अभियाच्या अंतर्गत पंचमहातत्त्वावर आधारित असून त्यामध्ये भूमी, जल, अग्नी, वायू व आकाश हे घटक आहेत. तसेच माझी वसुंधरा अभियान 3.0 स्वच्छ भारत अभयानांतर्गत भूमी या घटकावर दगडी पूल ते गजानन चौक या परिसरामध्ये पथनाट्य द्वारे वृक्षसंवर्धन, जैवविविधता, घनकचरा व्यवस्थापन यावर जनजागृती करण्यात आली.

वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. वृक्ष हे आपल्या पर्यावरणाचा सर्वात महत्वाचा घटक आहे. आपल्या अवती भोवती असणारे झाडे आपल्याला ऑक्सिजन व सावली देतात. पाऊस पाडण्यासाठी महत्त्वाचे आणि सर्वात गरजेची भूमिका वृक्ष करतात. रोजच्या वापरातून उरलेल्या निरुपयोगी पदार्थ म्हणजे कचरा त्यांची विल्हेवाट लावणे जगापुढे मोठी समस्या पण आपल्या फलटण नगरपालिकेने घनकचरा प्रकल्प उभारून अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. नागरिकांकडून सहा प्रकारे कचरा वेगळा घेऊन त्यावर व्यवस्थापन केले जाते. आधुनिकीकरणा मुळे निसर्गाशी दुरावा निर्माण झाला आहे. झाडे, वनस्पती, पक्षी, जलचर प्राणी यांचे आयुष्य नष्ट होत आहे. स्थानिक जैविक संपतीचे जतन व संवर्धन हे परिसरात राहणारे लोकच जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतात. मग चला आपण आपल्या वसुंधरेला वाचवु या; ही माहिती नागरिकांना देण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!