पालखी प्रस्थान नंतर तळाची स्वच्छता करण्यास सुरुवात : मुख्याधिकारी मोरे


दैनिक स्थैर्य | दि. 29 जून 2025 | फलटण | श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा काल फलटण मुक्कामी होता. त्यानंतर आज सकाळी फलटणवरून बरडकडे पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले आहे. प्रस्थान झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच पालखी तळाची स्वच्छता मोहीम नगरपरिषद व विविध संस्थांच्या सहयोगातून सुरू करण्यात आली असल्याची माहिती फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिली आहे.

पालखीचा मुक्काम झाल्यानंतर पालखीतळ हा मोठ्या प्रमाणावर कचऱ्याने वेढलेला असतो. पालखीतळाची तातडीने स्वच्छता केल्याने पालखी तळाशेजारी राहणाऱ्या नागरिकांना यामधून मोठा दिलासा मिळणार आहे.

यासोबतच फलटणच्या विमानतळावर पालखी मुक्कामी असते विमानतळावर शेकडो नागरिक दररोज व्यायामासाठी येत असतात, त्यांना सुद्धा लवकरच विमानतळ नियमित व्यायामासाठी जाता येणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपरिषद येथील मुख्याधिकारी अजय पाटणकर व त्यांची 25 कर्मचारी यांची टीम यांनी फलटण पालखीतळ येथे स्वच्छतेसाठी सेवा देण्यासाठी आले असून त्यांनी सुद्धा स्वच्छता सुरु केली आहे.


Back to top button
Don`t copy text!