मंगळवार तळ्याच्या स्वच्छतेचा आज पासून शुभारंभ; नगरसेवक वसंत लेवे यांचा पुढाकार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.३१ जानेवारी २०२२ । सातारा । सातारा शहराच्या पश्चिम भागातील ऐतिहासिक मंगळवार तळ्याचे पाणी पूर्णपणे हिरव्या रंगाचे झाल्यामुळे या या पाण्याचा प्रचंड दुर्गंधी येत आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक 18 चे नगरसेवक वसंत लेवे यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने तळ्याच्या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्याचा संकल्प केला आहे ही सफाई मोहीम सोमवारी दिनांक 31 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होत आहे.

ऐतिहासिक मंगळवार तळे हे खासदार उदयनराजे भोसले यांच्या खाजगी मालकीचे आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नैसर्गिक स्त्रोत प्रदूषित करणे व तेथील संवर्धनाला अडचण येईल अशा कृती करणे या पूर्णपणे अवैध आहेत त्यामुळे 2012 पासून या तळ्यामध्ये श्री विसर्जनही पूर्णपणे बंद करण्यात आले . बऱ्याच वेळा या पाण्यातील ऑक्सिजन संपून मासे मृत होऊन पाण्यावर येतात पाण्याची ऑक्सीजन लेवल वाढवण्यासाठी त्यात पुन्हा चुना टाकला जातो असे वारंवार करावे लागते . मुळात मंगळवार तळे हे 40 फूट खोल असून या तळ्याच्या आतील बाजूस नैसर्गिक पाण्याचे उपळे आहेत मात्र या पाण्याला उपसा नसल्यामुळे या पाण्यावर शेवाळ तयार होऊन संपूर्ण पाण्याला हिरवा रंग प्राप्त होतो.

महिनाभरापूर्वी या तळ्यात मासे मृत होऊन संपूर्ण पाणी हिरवेगार झाले या पाण्याचा प्रचंड दुर्गंध येत असून येता-जाता सातारकरांना ही त्याचे विदारक दर्शन घ्यावे लागत आहे प्रभाग क्रमांक 18 चे नगरसेवक वसंत लेवे यांनी पुढाकार घेऊन हे तळे स्वच्छ करण्याचा संकल्प सोडला आहे . स्वतः लेवे पदरमोड करून हे तळे स्वच्छ करणार आहेत ऐतिहासिक मंगळवार तळ्याचे सौंदर्य अबाधित राहावे आणि सातारा शहराच्या पर्यटनात वाढ व्हावी याकरिता तळ्याची सौंदर्य राखणे व जपणे हे सत्ताधारी सातारा विकास आघाडीचे काम आहे . तळे जरी प्रभागात नसले तरी तेथील दूषित पाण्याचा लोकांना त्रास होत आहे त्यामुळे लोककल्याणासाठी आम्ही स्वतः पुढाकार घेऊन या तळ्याची स्वच्छता करीत असल्याचे लेवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले याशिवाय संपूर्ण पायरी मार्गाची स्वच्छता तसेच भिंतीवर उगवलेल्या वृक्षांची नियम नियमित पद्धतीने छाटणी करून संपूर्ण पाणी उपसा करण्यात येणार आहे . हे पाणी टप्प्याटप्प्याने लगतच्या ओढ्यात सोडले जाणार आहे . ही सफाई मोहीम नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार असल्याचे वसंत लेवे मित्र समूहाच्या वतीने कळविण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!