दैनिक स्थैर्य । दि.०९ मार्च २०२२ । सातारा । पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर खेड ता. सातारानजिक कंटेनरच्या चाकाखाली सापडून क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. याबाबतची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुण्याहून कोल्हापुरकडे एक कंटेनर निघाला होता. खेड फाट्याजवळ आल्यानंतर चालकाला कंटेनरच्या समोरील बाजूची वायर तुटली असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याने महामार्गाच्याकडेला कंटेनर उभा केला. त्यानंतर क्लिनर खाली उतरून कंटेनरच्या चाकाजवळ पाहात असताना पाठीमागून आलेल्या दुसऱ्या कंटेनरने त्या क्लिनरला धडक दिली. त्यानंतर कंटेनरचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्या क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत अपघातातील मृतांची ओळख पटली नव्हती. सातारा शहर पोलीस या अपघाताचा तपास करीत आहेत.