सत्ता बदल झाल्यावर शहराच्या विकासाला चालना: ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर

प्रभाग ९ मधील रस्ता आणि शिवाजीनगरमधील वॉकिंग ट्रॅकच्या कामाचे भूमिपूजन संपन्न


स्थैर्य, फलटण, दि. ०७ ऑगस्ट : फलटण शहरात अनेक वर्षे एकाच पक्षाची सत्ता असूनही विकासाला खीळ बसली होती, मात्र आता माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून शहराच्या विकासाला चालना मिळाली असून सर्व रस्ते नव्याने होत आहेत, असे मत जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले आहे.

फलटण शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या गल्लीच्या काँक्रिटीकरण कामाचा आणि शिवाजीनगर येथील श्रीमंत स्व. दादराजे खर्डेकर नगर परिषद शाळा क्रमांक ७ च्या मोकळ्या जागेत वॉकिंग ट्रॅक बांधण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला.

यावेळी स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक सुदाम मांढरे, अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, फिरोज आतार, डॉ. प्रवीण आगवणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप चोरमले, युवा उद्योजक अमित भोईटे, भाजपा तालुकाध्यक्ष बापूराव शिंदे यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!