
दैनिक स्थैर्य । दि.१३ फेब्रुवारी २०२१ । सातारा । नगर भुमापनं अधिकाऱ्याच्या कामकाजावर भुमी अधिक्षक कार्यालयाने कर्तव्य कस्तुरीचा ठपका ठेवला आहे नागरिकांकडून वारंवार प्राप्त झालेल्या तक्रारीमुळे या प्रकरणाची चौकशी करणेकामी संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे यामुळे महसूल विभागांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणासंदर्भात प्राप्त झालेल्या माहितीनुसार सातारा नगर भूमापन कार्यालय अधिकारी किरण नाईक व संबंधित कर्मचारी जमिनीच्या नोंदी आणि मोजणी याची कामे प्रलंबित ठेवण्याचे काम करीत असल्याच्या तक्रारी भूमी अधीक्षक कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या .वारस नोंद या प्रकरणांमध्ये सुनावणी घेताना प्रतिवादी पार्टी हजर झाली नसल्यास निकाल देणे अपेक्षित असताना विरोधी पार्टीला हजर करा असे अजब फतवे भूमापन अधिकारी काढत असतात अशी तक्रार सजग नागरिक मंचाच्या वतीने करण्यात आली होती . सर्वसामान्य जनतेला फसवणूक करून त्यांना विनाकारण हेलपाटे मारायला लावले जातात आणि वारस नोंदी च्या सह इतर प्रकरणांमध्ये आर्थिक तडजोडी केल्या जातात याचे अनेक तक्रारी नागरिक मंचाच्या वतीने भूमी अधीक्षक कार्यालयात सादर करण्यात आले होते.
कार्यालयातील कर्मचारी ड्रोन सर्वे ला गेले आहेत असा कागद दारावर चिटकवून या कार्यालयाचे कर्मचारी खाजगी कामासाठी इतरत्र फिरत असतात असे अनेक प्रकरणात सिद्ध झाले आहे . मात्र याचा बोभाटा व्हायला नको म्हणून ते प्रकरण परस्पर दाबण्यात आल्याची चर्चा आहे नागरिकांना जमिनीचा नकाशाचे परत कधीही वेळ मिळत नसल्याची दुसरी तक्रार आहे नक्कल पडताळणीसाठी फ्री च्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट केली जात असल्याचे तक्रार आहे.
या सर्व तक्रारींची दखल घेऊन भूमी अधीक्षक कार्यालयाने संबंधितांना नोटीस बजावली असून या प्रकरणाची सुनावणी येत्या 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अधीक्षक साहेबांच्या केबिनमध्ये होणार असल्याची माहिती आहे सजग नागरिक मंच चे अध्यक्ष संतोष शेंडे यांनी नाग कोणत्याही नागरिकांच्या या संदर्भात तक्रारी असल्यास त्यांनी भूमी अधीक्षक कार्यालयाकडे तक्रार दाखल करावी असे आवाहन केले आहे.
 
					 
					 
					 
					
 
					 
					 
					 
					 
					 
					