उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी – डॉ.विनायक सावर्डेकर


दैनिक स्थैर्य । दि. १२ मे २०२३ । मुंबई । उष्णतेच्या लाटांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. यामुळे नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी वेळीच खबरदारी घ्यावी, असे आवाहन सेंट जॉर्ज रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात घेण्यात आलेल्या मुलाखतीतून केले आहे.

जगभरात वातावरणात अनेक बदल होत असून अचानक येणारी वादळे, पाऊस आणि उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटा वाढत आहेत. गेल्या काही वर्षांपासून भारतात उष्णतेच्या लाटा वाढत असून त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम पहावयास मिळत आहे. आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणे तसेच उष्माघातामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी नागरिकांमध्ये कशाप्रकारे जनजागृती करण्यात येत आहे आणि उष्माघात होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी, अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवरील माहिती डॉ.सावर्डेकर यांनी जय महाराष्ट्र कार्यक्रमातून दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरूवार, दि. 11 मे 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल. ही मुलाखत वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हे कार्यक्रम पाहता येतील.

ट्विटरhttps://twitter.com/MahaDGIPR

फेसबुकhttps://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूबhttps://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR


Back to top button
Don`t copy text!