दैनिक स्थैर्य । दि. २१ डिसेंबर २०२१ । वाई । वाई तालुक्यामध्ये मुले बेपत्ता होण्याचा प्रकार ही केवळ अफवा असल्याचे व अशा अफवांवर नागरिकांनी पालकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी केले आहे.
आत्ता नुकत्याच शाळा सुरु झाल्या आहेत.शाळे पासून दुरावलेली मुले शाळेत जाण्यास सांगितले,शाळेतील अभ्यास, पालकांनी किरकोळ कारणावरून रागवणे यामुळे मुले लगेच रागात ,पालकांना धडा शिकविण्यासाठी घरातून थोडे फार पैसे घेऊन बाहेर गावी जात आहेत.राग निघून जाताच व पैसे संपताच ही मुले पुन्हा घरी येत आहेत.अशा प्रकारे मुले बाहेर गेल्याने पालकांवर आणि पोलीस विभागावर याचा ताण येत आहे.
वाई परिसरात पालकांच्या डोकेदुखीचा विषय ठरलेला वाईतील मुले बेपत्ता होण्याचा प्रकार अखेर पोलिसांनी उघडकीस आणला असून बेपत्ता झालेली रविवार पेठेतील दोन मुले पोलिसांनी पनवेल येथून ताब्यात घेतली आहेत. विशेष म्हणजे सदर मुले घरातून पैसे घेऊन स्वत हून चैन करण्यासाठी पळून गेली होती. मुले पोलिसांना सापडल्यावर त्यांची चौकशी करून व शहानिशा करून पोलिसांनी मुले पालकांच्या ताब्यात दिली आहेत.
मात्र नागरिकांनी व पालकांनी थोडे सावध आणि सजग राहावे.मुलांच्या हलचालीकडे लक्ष ठेवावे.त्यांच्यातील बदल टिपावेत असेही पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी सांगितले.मागील काही दिवसात मुले गायब होण्याचा प्रकार घडत असल्याचे समाज माध्यमावर येऊ लागल्यावर सर्वत्र उलट सुलट चर्चा घडत होत्या.तालुका गट शिक्षण अधिकाऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवून पालकांनी मुलांची शाळेत सोडावे आणि घेऊन जावे असे पत्रक काढल्याने शाळांनीही पालकांना तशी समज दिली.यामुळे एकूणच गोंधळात भर पडली.मात्र निघून जाणारी मुले जवळपास चे नातलग,जवळची रक्कम खर्च होई पर्यंत बाहेर रहात आहेत.त्यामुळे वाई परिसरात अशी कोणतीही मुले पळवणारी गँग आलेली नाही.नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.संशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक भरणे यांनी केले आहे.