दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑक्टोबर २०२१ | फलटण | फलटण शहरामध्ये बहुतांश नागरिकांच्या लसीकरणाचा पहिला डोस झालेला आहे. परंतु दुसऱ्या डोसची उपलब्धता होत नसल्याने बहुतांश नागरिकांचे दुसरा डोस प्रलंबित होते. आता लसीकरणामधील दुसरा डोस सुद्धा प्रशासनाच्या सहकार्यातून लवकरात लवकर उपलब्ध होत आहेत. तरी मंगळवार पेठ व फलटण शहरातील सर्व नागरिकांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घ्यावेत व कोरोना पासून बचाव करण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती वाढावावी, असे मत नगरसेवक सनी अहिवळे यांनी व्यक्त केले.
मंगळवार पेठ येथे नगरसेवक सनी अहिवळे यांच्या माध्यमातून लसीकरणाची विशेष मोहीम आयोजित करण्यात आलेली होती. त्या वेळी नगरसेवक सनी अहिवळे बोलत होते.
यावेळी मंगळवार पेठेमधील दोनशेहून अधिक जणांचे लसीकरण हे नगरपालिकेच्या माध्यमातून व नगरसेवक सनी अहिवळे यांच्या विशेष प्रयत्नातुन करण्यात आले.