कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे : कोरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कोरेगांव, दि. 1 : रहिमतपूर शहरात दोन नागरिकांना कोरोनाची लागण झाली. ही बाब नगरपालिका पदाधिकारी व प्रशासनाने गांभीर्याने घेतली आहे.  जवळपास निम्मे शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. दि. 1 ऑगस्टपासून सलग तीन दिवस संपूर्ण शहरामध्ये जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष आनंदा कोरे यांनी केले आहे.

रहिमतपूर पालिका सभागृहात आयोजित केलेल्या कोरोना प्रादुर्भाव आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, मुख्याधिकारी विनायक औंधकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, माजी नगराध्यक्ष वासुदेव माने, विरोधी पक्षनेते नीलेश माने, मंडलाधिकारी विनोद सावंत, तलाठी प्रशांत सदावर्ते, अविनाश माने, नगरसेवक विद्याधर बाजारे, पोलीस पाटील दीपक नाईक, सचिन बेलागडे, नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.

आनंदा कोरे म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात स्वच्छता, निर्जंतुकीकरण यासह अत्यावश्यक सर्व उपाययोजना मोहीम राबविण्यात येणार आहे तसेच या काळात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशान्वये लागू करण्यात आलेले कोविड-19 संदर्भातील सर्व नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, सवयभान तत्त्वाची अंमलबजावणीसाठी मास्कचा वापर करा, सुरक्षित अंतर ठेवा, घरीच सुरक्षित राहून प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन केले.

सुनील माने म्हणाले, की शहरातील 24 व 48 वर्षीय पुरुष नागरिक यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. नागरिकांनी भयभीत व विचलित न होता सतर्क राहून नगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे. कारण आजपर्यंत नागरिकांनी सहकार्य केल्यामुळेच सलग सव्वा चार महिने शहरात कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता.

या चार महिने कालावधीत नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी आपले कर्तव्य समजून मोलाची साथ दिली होती. अशीच साथ यापुढे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला द्यावी.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!