
दैनिक स्थैर्य । दि. २१ नोव्हेंबर २०२२ । बारामती । लोकशाही मध्ये प्रत्येकास मतदान करण्याचा हक्क आहे, मतदानावरच लोकशाही मधील प्रतिनिधी निवडून येतात परंतु मतदान यादी मध्ये नाव नाही म्हणून कोणी मतदान करण्यापासून वंचित राहू नये असे प्रतिपादन करून देसाई इस्टेट मतदान केंद्रास नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याबद्दल बारामती शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष जय पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
बारामती शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मतदान जागृती अभियान राबवण्यात येत आहे शनिवार दि. 19 नोव्हेंवर रोजी जय पाटील यांनी देसाई इस्टेट मतदान केंद्रास सदिच्छा भेट दिली या प्रसंगी जय पाटील बोलत होते.
या वेळी शहर युवक चे अध्यक्ष अमर धुमाळ, नगरसेवक अतुल बालगुडे, उपाध्यक्ष छगन आटोळे युवक उपाध्यक्ष संग्राम खंडागळे, देसाई इस्टेट युवक शाखा अध्यक्ष युवराज गजाकस, अमोल पवार, राहुल वायसे डॉ नितीन काळे,बाळासाहेब आटोळे,किशोर रसाळ,आकाश काटे व इतर मान्यवर आणि मतदार नोंदणीस आलेले युवक, युवती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्तित होते.
18 वर्ष पूर्ण झालेले युवक युवती प्रथमच येणाऱ्या निवडणूकीत मतदान करणार असल्याने उस्फुर्तपणे त्यांचा प्रतिसाद मिळत असून व्यवसाय व रोजगारानिमित्त जळोची परिसरात स्थायिक झालेले नागरिक सुद्धा मतदान नोंदणीस प्राधान्य देत असल्याचे नगरसेवक अतुल बालगुडे यांनी सांगितले. मतदानाचा टक्का वाढावा व आठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येकास मतदान करता यावे म्हणून अभियान राबवत असल्याचे युवक अध्यक्ष अमर धुमाळ यांनी सांगितले.
आभार राहुल वायसे यांनी सांगितले स्वागत अमोल पवार यांनी केले