दैनिक स्थैर्य । दि. ०९ जुलै २०२३ । सातारा । पाणलोट क्षेत्रामधील संततधार पावसामुळे मोरणा (गुरेघर) मध्यम प्रकल्पाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. धरणाची वक्र द्वारे बंद करण्यात आली नाहीत. त्यामुळे पुढील १२ तासामध्ये सदर प्रकल्पाच्या सांडव्यावरुन प्रवाह सुरु होऊ शकतो. तसेच सांडव्यावरुन विसर्ग सुरू झाल्यानंतर विद्युत ग्रहातून विसर्ग सुरू करण्यात येईल. मोरणा नदी काठावरील सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नदी पात्रामध्ये कोणीही प्रवेश करु नये. पर्जन्यमान वाढल्यास सांडव्याद्वारे विसर्गात कोणत्याही क्षणी वाढ करण्यात येऊ शकते.