दरडप्रवण क्षेत्रातील सातारा व जावली तालुक्यातील नागरिकांनी सतर्क राहुन स्थलांतरीत होण्याचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑगस्ट २०२२ । सातारा । हवामान खात्याच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यामध्ये दि. 7 ते 11 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये रेड व ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे.सद्य:सिस्थितीमध्ये  सातारा व जावली तालुक्यात खुप मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु झालेला असून, काही ठिकाणी अतिवृष्टी किंवा ढगफुटी सदृश्य पर्जन्यमान परिस्थितीमुळे या तालुक्यांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण होणे, दरड कोसळणे, जमिनीला भेगा पडणे, भूस्खलन  होवून जिवित व वित्त हानी होण्याची शक्यता असल्यामुळे धोकादायक गावांमधील नागरिकांनी आपल्याकडील पशुधन व इतर महत्वाच्या साधनसामुग्रीसह सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. आवश्यक असल्यास तहसिलदार यांची मदत घेण्यात यावी असे उपाविभागीय अधिकारी सातारा उपविभाग मिनाज मुल्ला यांनी कळविले आहे.


Back to top button
Don`t copy text!