स्थैर्य, खंडाळा, दि. 31 : करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कन्टेमेंन्ट झोन मधील नागरीकांनी कडक शिस्त पाळावी, अन्यथा सर्वकाही अवघड होईल याचे भान प्रत्येकाने ठेवावे, असे प्रतिपादन आ. मकरंद पाटील यांनी केले.
खंडाळा तालुक्यात करोनाचे रूग्ण आढळलेल्या येळेवाडी, पाडळी आदी गावांना व जी गावे कंटेन्मेंट झोनमध्ये गेली अशा गावांना आ. पाटील यांनी प्रशासकीय अधिकार्यांसमवेत भेटी देवून आढावा घेतला. पाडळी येथे अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थांशी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद बांधकामचे कार्यकारी अभियंता तथा खंडाळा विभागाचे कन्टेमेन्ट झोन अधिकारी लवटे, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मनोज पवार, सदस्या दीपाली साळुंखे, खंडाळयाचे तहसीलदार दशरथ काळे, खंडाळा पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे, उपसभापती वंदना धायगुडे-पाटील, बाळासाहेब साळुंखे, गटविकास अधिकारी माणिकराव बिचुकले, तालुका वैद्यकिय अधिकारी अविनाश पाटील, लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष चौधरी, विविध गावचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
आ. मकरंद पाटील म्हणाले, आलेल्या संकटावर कडक शिस्त व बंधने पाळूनच मात करता येणार आहे. त्यासाठी कोरोना ग्राम समितीने कडक धोरण अवलंबवावे. सील केलेल्या व कंटेन्मेट झामध्ये प्रशासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन केले तरच करोनाची साखळी तुटणार आहे. यासाठी गावातील रस्ते बंद करावेत, भाजीपाला व दुधाची ने आण करण्यावर तसेच बाहेरून येणारे व गावातून बाहेर जाणारांवर बारकाईने लक्ष द्यावे. पुणे-मुंबईवरुन येणारांना योग्य क्वारंटाईन करून काळजी घ्यावी. यावेळी ग्रामस्थांनी गावातून रात्रीची वाळूची चोरटी वाहातूक होत आहे. भाजीपाला व दूध बाहेर जात असून त्यावर नियंत्रण आणण्याची मागणी केली. त्यावेळी तहसीलदार दशरथ काळे यांनी गावातून वाळूची कोणी चोरटी वाहतूक करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. भाजीपाला व दूध वाहतूकीबाबत कोरोना ग्राम समितीने योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना यावेळी करण्यात आली. यावेळी नंदकुमार घाडगे, यशवंत साळुंखे, उपसरपंच सुनिता धायगुडे, माजी सरपंच दत्तात्रय धायगुडे, हणमंत धायगुडे, तात्यानाना धायगुडे, राजेंद्र नांगरे -पाटील, गजानन धायगुडे, तात्या शेंडगे, शामराव निकम, नवनाथ शेंडगे, लालासाहेब धायगुडे, अॅड. गणेश धायगुडे आदी उपस्थित होते.