नागरिकांनो घाबरू नका पण खारबारदारी घ्या; आपल्या निष्काळजीपणामुळेच कोरोना वाढतोय


दैनिक स्थैर्य । दि. १० जानेवारी 2022 । सातारा । जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसची विविध लक्षणं आतापर्यंत समोर आली आहे. यातली चिंताजनक गोष्ट म्हणजे काही लक्षणं नव्याने समोर आली आहेत. या नव्या लक्षणांबद्दल WHO ने त्यांच्या वेबसाईटवर माहिती दिली आहे. त्याचबरोबर ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या देखील वाढते आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती किती गंभीर आहे ? लॉकडाऊनची होण्याची शक्यता आहे का ? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेले आहेत. आपल्याला जर लॉकडाऊन टाळायचे असेल तर शाशनाने दिलेल्या निर्बंधांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही परंतु खबरदारी घेणे गरजेचे आहे. आपल्या सर्वांचा निष्काळजीपणाच कोरोना वाढीला कारणीभूत ठरत आहे. तरी नागरिकांनी कोरोना बाबतच्या त्रिसूत्रीचा अवलंब जर केला तर कोरोनाच्या कोणत्याही व्हेरियंटला आपण रोखू शकतो व लॉकडाऊन सुद्धा टाळू शकतो.

सध्या सगळीकडे मास्क अनिवार्य केला आहे. मास्क न वापरणाऱ्या लोकांना अनेक ठिकाणी दंड भरावा लागत असल्याच्याही बातम्या आपण वाचल्या असतील. मास्क वारण्यासोबतच आपण सर्वांनी कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस वेळेमध्ये घेणे गरजेचे आहे. लसीकरण झाल्यानंतर कोरोना होत नाही असे नाही परंतु कोरोना सोबत लढण्यासाठी आपले शरीर सज्ज असते. लसीकरण पूर्ण झाले असेल तर आपण गृह विलगीकरणामध्येच बरे होवू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

संसर्गाचा धोका टाळण्यासाठी खोकणाऱ्या किंवा शिंकणाऱ्या व्यक्तीपासून किमान 1 मीटर अंतरावर उभं राहण्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेनं केली आहे. आपण सर्वानीच चेहऱ्यावर मास्क बांधावेत, असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. तोंडातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या थेंबातून म्हणजेच ड्रॉपलेट्समधून विषाणूची लागण होते, या आधारावर हे अंतर ठरवण्यात आलेलं आहे. बहुतांश ड्रॉपलेट हवेत विरून जातात किंवा संबंधित व्यक्तीच्या आसपास खाली जमिनीवर पडतात, असं आतापर्यंत मानलं जात होतं. परंतु ओमिक्रोन हा व्हेरियंट अत्यंत वेगाने पसरत असल्याचे हि समोर आलेले आहे.

खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर तोंडातून छोटी मात्र वेगवान अशी हवा बाहेर पडते. याला संशोधकांनी क्लाऊड ऑफ गॅस म्हटलं आहे. या क्लाऊड ऑफ गॅसमध्ये वेगवेगळ्या आकाराचे पाण्याचे थेंब असू शकतात. यातले अतिसूक्ष्म थेंब दूरवर वाहून नेले जाऊ शकतात, असं या संशोधनात आढळून आलं आहे. प्रयोगशाळेतील नियंत्रित वातावरणात हा प्रयोग करण्यात आला. यात असं आढळलं आहे की अशापद्धतीने पाण्याचे अतिसूक्ष्म थेंब खोकलल्यानतंर 6 मीटर तर शिंकल्यानंतर 8 मीटर अंतरापर्यंत जाऊ शकतात.


Back to top button
Don`t copy text!