दैनिक स्थैर्य । दि. १८ डिसेंबर २०२१ । फलटण । दक्षिण आफ्रिकेच्या युगांडा येथून फलटण येथे आलेल्या चौघांपैकी तिघांची ओमिक्रोनच्या चाचणीचा अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. तरी फलटण तालुक्यातील नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घ्यावी व सर्वानी लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करून घ्यावेत, असे आवाहन फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केलेले आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या युगांडा येथून आलेल्या चौघाजणांपैकी तिघांचा अहवाल हा ओमिक्रोन बाधित आला आहे. त्याच अनुषंगाने त्यांच्या इमारतीमध्ये वास्तव्य होते त्या ठिकाणी राहत असलेल्या सर्वांच्या ओमिक्रोनच्या अनुषंगाने कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत. त्यासोबतच सध्या संबंधित रुग्णांवर हे फलटण येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार चालू आहेत, त्याठिकाणी कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या ओमिक्रोनच्या अनुषंगाने कोरोना चाचण्या करण्याचे आदेश हे फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिलेले आहेत.
कोरोना व ओमिक्रोनच्या प्राश्वभूमीवर फलटण शहरासह तालुक्यातील नागरिकांनी स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घेणे गरजेचे आहे. जर गरज असेल तरच घराबाहेर पडावे. आवश्यकता नसताना घराच्या बाहेर पडू नये. त्यासोबतच मास्कचा योग्यरीत्या वापर करणे सुद्धा गरजेचे आहे. वारंवार हात धुणे हि काळजी घेणे गरजेचे आहे. यासोबतच सामाजिक अंतर बाळगूनच वावरणे गरजेचे आहे, असे सुद्धा आवाहन फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केलेले आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका : प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप
युगांडावरून फलटण येथे आलेले तिघांचा ओमिक्रोन संशियितांचा अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. तरी याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध मेसेज व्हायरल होण्याची शक्यता आहे. तरी कोणत्याही अधिकृत माहिती शिवाय इतर कोणत्याही माहितींवर किंवा मेसेजस वर विश्वास ठेवू नये असे आवाहन सुद्धा फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केलेले आहे.