स्थैर्य, फलटण, दि. १९ : सध्या सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना या साथ रोग आजाराचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. तरी सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व पदाधिकारी, अधिकारी व कार्यकर्त्यांनी दुरध्वनी द्वारे संपर्क साधावा असे आवाहन विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेले आहे.
सध्या संपुर्ण राज्यासह सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रूग्ण हे मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. तरी आगामी काळामध्ये सर्वांनी आपली व कुटुंबातील सर्वांची काळजी घेणे आवश्यक आहे. शासनाच्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी व मी जबाबदार या मोहीमेप्रमाणे आपण सर्वांनी स्वतःची व कुटुंबातील सर्वांची काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोना काळात कोणालाही माझ्याशी संपर्क साधायचा झाल्यास त्यांनी दुरध्वनी द्वारे संपर्क साधावा असे आवाहन विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेले आहे.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर – 9850883388, मुकुंद रणवरे – 9881020241, डी. बी. तारू – 9850027500, बापुराव गावडे – 9623990300 या दुरध्वनी द्वारे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी संपर्क साधावा, असेही या वेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे स्वीय्य सहाय्यक व निंभोरे गावचे उपसरपंच मुकुंद रणवरे यांनी स्पष्ट केले.