सातारा पालिकेच्या आरक्षण सोडतीमुळे खुल्या प्रभागात चुरस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ जून २०२२ । सातारा । सातारा पालिकेच्या पंचवीस प्रभागांची आरक्षणं सोडतीद्वारे मंगळवारी येथील शाहू कला मंदिर येथे जाहीर झाली .आरक्षणाच्या नियमाप्रमाणे पन्नास जागांसाठी पंचवीस महिला व पंचवीस पुरूषांना प्रतिनिधित्वाची संधी मिळणार आहे . महिला प्रवर्गात 21 जागा खुल्या तर 4 जागा अनुसुचित जाती व जमातीसाठी तर पुरुष वर्गात 22 जागा खुल्या गटाच्या तर तीन जागा अनुसुचित जमातीसाठी राखीव झाल्या आहेत . प्रभाग क्रं १ मध्ये यंदा प्रथमच लोकसंख्या वाढीमुळे अनुसुचित जमातीचे महिला प्रवर्गाचे आरक्षण पडल्याने भटक्या जमातीचे नेतृत्व पहिल्यांदाच पालिकेत पोहचणार आहे .पालिकेच्या आरक्षित अकरा ओबीसी जागांचा निर्णय कायद्याच्या कचाटयात अडकल्याने खुल्या गटांच्या जागांसाठी राजकीय चुरस वाढली आहे .

नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी येथील शाहू कला मंदिरात सोमवारी (दि. १३) सकाळी आरक्षण सोडत काढण्यात आली. अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला अशी आरक्षणे यावेळी निश्चित करण्यात आली. हद्दवाढ झाल्याने यंदा ५० पैकी २५ महिला व २५ पुरुष पालिकेत निवडूण जाणार आहेत. प्रांत मिनाज मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत प्रक्रियेला सुरवात झाली . मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी आरक्षण सोडतीची माहिती दिली. तर निवडणूक निरीक्षक मोहन प्रभुणे यांनी या सोडतीची प्रत्यक्ष प्रक्रिया पार पाडली .यानंतर सकाळी साडेअकरा वाजता ऐश्वर्या जाधव या शाळकरी मुलीच्या हस्ते आरक्षणाची पहिली चिठ्ठी काढण्यात आली. या आरक्षण सोडतीमध्ये प्रभाग क्रमांक 1 2 4 8 13 व 15 या सात प्रभागांमध्ये अनुसुचित जमातीचे आरक्षण पडले . प्रभाग 1 अ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाला आहे. हद्दवाढीमुळे भटक्या जमातीचे आरक्षण निर्माण होऊन या प्रवर्गातील नेतृत्व पहिल्यांदाच पालिकेत पोहचणार आहे . खुल्या गटांसाठी मागास प्रवर्ग वगळता 21 महिला व 22 पुरुष अशा 43 खुल्या जागांमुळे इच्छुकांच्या राजकीय आकांक्षा वाढल्या आहेत .

आरक्षण सोडतीची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने अर्धा तासात पार पाडली . यामध्ये प्रभाग एक अनुसुचित जमाती व प्रभाग 2,3,4 8 13 15 अनुसुचित जातीसाठी आरक्षित होऊन तर प्रभाग 16 ते 25 खुल्या जागांसाठी राजकीय लढती पहायला मिळणार आहे . प्रभाग 2 ,3, 8, या प्रभागात ब गटासाठी महिला सर्वसाधारण उमेदवारांना संधी मिळणार आहे .ऐश्वर्या कोटगी , वैष्णवी जाधव दिव्या मोरे व प्रणव जाधव यां विधार्थ्यांना आरक्षणाच्या चिठ्ठया उघडण्याची संधी देण्यात आली . या आरक्षण सोडतीची पालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी आरक्षण निहाय मांडणी केली . यावेळी नगर विकास आघाडीचे पक्ष प्रतोद अमोल मोहिते, माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, शेखर मोरे पाटील भालचंद्र निकम सजग नागरिक मंचचे संतोष शेंडे, अमित शिंदे, माजी नगरसेवक विजय काटवटे यावेळी उपस्थित होते . सातारा विकास आघाडीचा एकही नगरसेवक आरक्षण सोडत प्रक्रियेला उपस्थित नव्हता .

प्रभाग क1 अ- अनुसुचित जमाती ( महिला )
1 ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रं 2 अ – अनुसुचित जाती
क्रं2 ब -सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रं 3 अ- अनुसुचित जाती
3 ब- सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रं 4 अ- अनुसुचित जाती महिला प्रभाग क्रं4 ब- सर्वसाधारण

प्रभाग क्रं 5 अ- सर्वसाधारण महिला 5 ब- सर्वसाधारण

प्रभाग क्रं 6 अ= सर्वसाधारण महिला 6 ब- सर्वसाधारण

प्रभाग क्रं 7 अ- सर्वसाधारण महिला क्रं 7 ब- सर्वसाधारण

प्रभाग क्रं 8 अ- अनुसुचित जाती
8 ब- सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रं 9अ- सर्वसाधारण महिला 9 ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रं 10 अ- सर्वसाधारण महिला 10 ब सर्वसाधारण

प्रभाग कं 11 अ- सर्वसाधारण महिला 11 ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रं 12 अ – सर्वसाधारण महिला 12 ब -सर्वसाधारण

प्रभाग क्र 13 अ- अनुसुचित जाती महिला 13 ब- सर्वसाधारण

प्रभाग क्रं 14 अ- सर्वसाधारण महिला 14 ब- सर्वसाधारण

प्रभाग क्रं 15 अ- अनुसुचित जाती महिला 15 ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रं 16 ते 25

अ- सर्वसाधारण महिला

ब- सर्वसाधारण


Back to top button
Don`t copy text!