चीनचे मावळते वाणिज्यदूत टँग गोकाई यांनी घेतली राज्यपालांची भेट


दैनिक स्थैर्य । दि. १६ मार्च २०२२ । मुंबई । मुंबई येथील आपला 4 वर्षांचा कार्यकाळ संपवून परतत असलेले चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत टँग गोकाई यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे  निरोप भेट घेतली.

पुढील वर्षी चीनमध्ये एशियन फुटबॉल चॅम्पियनशिप होणार आहे. यानिमित्त टँग गोकाई यांनी राज्यपालांना फुटबॉलची प्रतिकृती भेट दिली. यावेळी उप वाणिज्यदूत वांग यान्हूआ देखील उपस्थित होत्या.


Back to top button
Don`t copy text!